अहमदनगर (अकोले) - अकोले तालुक्यातील परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे तांडव सुरु असून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढला आहे Damage due to rain in Ahmednagar district काल मध्यरात्री झालेल्या पावसाने सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालय भुईसपाट झाले आहे सुदैवाने येथे जीवितहानी टळली आहे
नवीन वर्गखोल्या उभारल्या अकोले तालुक्यातील सावरकुटे येथील स्व बाबुराव सखाराम बोऱ्हाडे बी एस बी एज्युकेशनल संस्था जोगेश्वरी विद्यालयाची इमारत गुरुवारी रात्री भुईसपाट झाली त्यामध्ये शाळेची भिंत पडून बाकांचे नुकसान झाले उल्हासनगर या संस्थेच्या जोगेश्वरी विद्यालय सावरकुटे हे वर्षानुवर्षे समाज मंदिर मारुती मंदिर तसेच खासगी घरांमध्ये भरत होते मागील वर्षी संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आठवी नववी व दहावीच्या वर्गासाठी नवीन वर्गखोल्या उभारल्या आहेत
शिक्षक बांधवांनी हळहळ व्यक्त केली या सगळ झाल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे चालू होते आठवी नववी दहावीचे विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत होते पण वादळी पावसामुळे रात्रीच्या वेळेस शाळाच भुईसपाट झाली त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले रात्रीची वेळ असल्यामुळे पावसाचाही जोर जास्त होता शाळेची महत्त्वाची कागदपत्रे विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वह्या पुस्तके प्रकल्प पाण्याने भिजल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक बांधवांनी हळहळ व्यक्त केली विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वर्ग खोल्या नाहीत विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना वर्ग भरविण्यासाठी मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
हेही वाचा Rakshabandhan कर्तव्यावरील चालक भावाला एसटी थांबवून रस्त्यावरच बहिणीने बांधली राखी