अहमदनगर - सम-विषम दिवसांचा फॉर्म्युला वापरून मुलगा होईल की मुलगी हे ठरवता येते, असे वक्तव्य कीर्तनात केल्याने इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याचा ठपका ही ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रकारामुळे आपण त्रासलो असून आता डोक्यावरील फेटा उतरवून शेती करतो, असे त्यांनी भिंगार येथील जाहीर कीर्तनात सांगितले.
या सर्व प्रकारामुळे आठ दिवसात आपले वजन अर्धा किलोने कमी झाले आहे. त्यामुळे आता डोक्यावरील फेटा उतरवून कीर्तन करणे सोडून देतो आणि शेती व्यवसाय करतो, असे ते म्हणाले. शुक्रवारी परळी व शनिवारी नगर शहराजवळील भिंगार येथे कीर्तनात त्यांनी आपले हे मत व्यक्त केले.
हेही वाचा - टायमिंग हुकलं का क्वॉलिटी खराब,' वादग्रस्त वक्तव्यावरुन इंदोरीकर महाराज अडचणीत
आता या दोन्ही ठिकाणच्या किर्तनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शनिवारी भिंगार येथील कीर्तनाला इंदोरीकर आपल्या खासगी सुरक्षा व्यवस्थेत आले होते. तसेच माध्यमांना चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.