शिर्डी (अहमदनगर) Ashish Shelar On World Cup : भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावलीय. (BJP Leader Ashish Shelar) यानंतर त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके यांनी शेलार यांचा शॉल, साई मूर्ती देऊन सन्मान केलाय. साई दर्शन घेऊन शेलार मंदिराबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुंबई येथे 15 नोव्हेंबर रोजी भारत-न्युझीलंड यांच्यात झालेल्या सेमिफायनल सामन्यात भारताने न्युझीलंडचा पराभव करत घवघवीत यश मिळवलं आहे. ( Ashish Shelar Shirdi Tour) येणाऱ्या फायनल मध्येही भारत जिंकणार असल्याचं भाजपा नेते आशीष शेलार म्हणाले. भारत फायनलही जिंकावा अशीही प्रार्थना यावेळी आशिष शेलार यांनी साईबाबांच्या चरणी केलीय. यावेळी मात्र शेलारांनी राजकीय मुद्द्यावर बोलण्यास टाळले.
आयसीसीचं विश्वविजेत्या कर्णधारांना आमंत्रण: क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना अविस्मरणीय बनवण्यासाठी आयसीसीनं एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात यापूर्वीच्या सर्व विश्वविजेत्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. हा सामना पाहण्यासाठी आयसीसीनं 1975 ते 2019 या कालावधीतील विश्वविजेत्या संघांच्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. या सर्व कर्णधारांना खास ब्लेझरही देण्यात येणार आहे. सामना पाहताना हे सर्व कर्णधार ब्लेझर घालून बसतील.
'लेझर लाईट शो'चं नियोजन: क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास लेझर लाईट शो आणि लाईट इफेक्टचं आयोजन करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या तरुणांनी हा शो संयोजित केला आहे. हा शो कोल्हापूरचे दोन तरुण संपूर्ण जगाला दाखवणार आहेत.
'लेझर शो'मध्ये कोल्हापूरच्या तरुणांची कमाल: आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचलाय. तसंच यापूर्वी दोन वेळा भारतानं विश्वचषकावर नाव कोरलं होतं. यंदा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. देशभरात अंतिम सामन्यासाठी क्रिकेटचा फिव्हर जोरात चढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना अधिक आनंद देण्यासाठी मैदानावर खास लेझर शो तसंच लाईट इफेक्ट करण्यात येतात. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात अंधार पडल्यानंतर डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्र राहिलंय. डिम शो आणि ग्राफिक शो सादर केला जातो. हाच शो कोल्हापूरचे तरुण अख्ख्या जगाला दाखवणार आहेत. अमित पाटील आणि रामकृष्ण वागराळे अशी या तरुणांची नावे आहेत. 2011 ला सुरू केलेल्या लाईटच्या व्यवसायात त्यांनी नवनवे तंत्रज्ञान स्वीकारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.
हेही वाचा:
- जगात भारी कोल्हापुरी! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर चमकणार कोल्हापूरचा 'लेझर शो'
- विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्व 'विश्वविजेते' कर्णधार राहणार उपस्थित; 'शेजारी' मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता
- वर्ल्ड कपचा भव्य समारोप समारंभ; वायुसेनेचा 'एअर शो', जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया फायनलपूर्वी काय विशेष तयारी