ETV Bharat / state

अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्र हेच सरकारचे 'प्राधान्य' असल्याचे दिसले - अजित नवले

कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हेच सरकारचे 'प्राधान्य' असल्याचे आजच्या अर्थसंकल्पात पाहावयास मिळाले, असे मत अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले.

Budget Ajit Navale reaction
डॉ. अजित नवले
author img

By

Published : Feb 1, 2021, 7:56 PM IST

अहमदनगर - अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये, कोरोना लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली असल्याचे मान्य करण्यात आले होते. कोरोना पश्चात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्यासाठी शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती. मात्र, प्रत्यक्षात कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हेच सरकारचे 'प्राधान्य' असल्याचे आजच्या अर्थसंकल्पात पाहावयास मिळाले, असे मत अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले.

माहिती देताना भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले

हेही वाचा - साईबाबा मंदिर परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून रिपोर्टरवर गुन्हा दाखल

शेतीमालाच्या खरेदीच्या क्षेत्रात अर्थमंत्र्यांनी आपली पाठ थोपटून घेत सरकारने खूप चांगली कामगिरी केली असल्याचे वक्तव्य केले. गहू, धान, डाळी व कापूस खरेदीसाठी सरकारने मोठ्या रकमा खर्च केल्याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले. या रकमा सरकारने जणू शेतकऱ्यांना 'अनुदान' म्हणून देऊन टाकल्या आहेत, असा 'समज' निर्माण करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला. प्रत्यक्षात शेतीमालाच्या सरकारी खरेदीसाठी खर्च केलेल्या या रकमेपैकी केवळ आधारभाव व शेतीमालाचा बाजारभाव यातील फरका इतक्याच रकमेची प्रत्यक्ष 'झळ' सरकारला बसलेली असते. जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांच्या तुलनेत ही 'झळ' अत्यल्प असते, हे या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे, असे नवले म्हणाले.

सरकार कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांवर ठाम असल्याचे सिद्ध - नवले

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन आणि शेती अरिष्ट पाहता, देशभरातील शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी आशा राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होती. शिवाय शेतीमाल उत्पादन, वाहतूक, साठवणूक प्रक्रिया व विक्री क्षेत्रातही सरकारने गुंतवणुकीसाठी हात मोकळा सोडणे अपेक्षित होते. मात्र, या संपूर्ण क्षेत्रात कॉर्पोरेट घराण्यांनीच गुंतवणूक करावी व त्या बदल्यात प्रचंड नफा कमवावा असेच धोरण सरकारने गेल्या काही वर्षात घेतले आहे. सरकारने केलेले तीनही कृषी कायदे याच धोरणांचा परिपाक आहेत. आंदोलनाच्या प्रचंड दबावानंतरही हे कायदे सरकारने मागे घेतलेले नाहीत. शेती क्षेत्रातील गुंतवणुकीतून अंग काढून घेत अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकार आपल्या याच कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांवर ठाम असल्याचे सिद्ध झाले, अशी टीका नवले यांनी केली.

श्रमिक जनतेला उपेक्षित करणारा अर्थसंकल्प - नवले

मागील अर्थसंकल्पाच्या काळात अर्थव्यवस्थेची 'पुरवठा' बाजू मजबूत होती. 'मागणी' बाजू मात्र कमकुवत होती. कोरोना लॉकडाऊनमुळे आता मात्र पुरवठा व मागणी अशा दोन्ही बाजू कोसळल्या आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पात पुरवठा व मागणी दोन्ही बाजूंवर समतोल काम करण्याची आवश्यकता होती. सरकारने मात्र पुरवठा बाजूला बळ देत असताना मागणी बाजूकडे दुर्लक्ष केले आहे. एकंदरीत कॉर्पोरेट घराण्यांना व औद्योगिक क्षेत्राला नफा आणि विकासाची संधी देणारा आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार व ग्रामीण श्रमिक जनतेला उपेक्षित करून आर्थिक विपन्नावस्थेच्या खड्ड्यांमध्ये लोटवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नवले म्हणाले.

हेही वाचा - शिर्डीत निराधारांसाठी हक्काचा आधार 'द्वारकामाई'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.