शिर्डी(अहमदनगर) - कोरोनाचे रुग्ण वाढु लागल्याने राज्य सरकारकडुन नियम पुन्हा कडक करण्यात आले आहेत. साई संस्थानने देखील साई दर्शनासाठी आणखीन कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याचा परिणाम भाविकांच्या गर्दीवर होऊ लागला आहे. भाविकांचाी गर्दी होत नसल्यामुळे शिर्डीतील व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
व्यावसायिकांवर परिणाम -
महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेल्या शिर्डीचे साईबाबा मंदिर लॉकडाऊनच्या आठ महिन्यानंतर उघडले होते. एक महिन्यानंतर शिर्डीत दररोज 25 हजार भाविकांची गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिकही खूश झाले होते. मात्र त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन ही सुरू झालं आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी सुरू करण्यात आल्याने साईबाबांच्या मंदिरात होणारी रात्रीच्या शेजाआरतीला आणि पहाटेच्या काकड आरतीला भाविकांना मंदिरात प्रवेश बंद आणि गुरुवार, रविवार साईबाबांच्या दर्शनासाठी देण्यात येणाऱ्या मोफत बायोमेट्रिक पास ही बंद करण्यात आले असल्याचं साईबाबा संस्थानकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर याचा मोठा परिणाम झाला असल्याने शिर्डीतील व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
राज्यात कोरोना रुग्ण वाढु लागल्याने राज्य सरकारने नियम आणखी कडक केले असल्याने याचा सर्वात प्रथम फटका शिर्डीतील व्यावसायिकांना बसला आहे. त्यात शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आणखीन कडक नियम संस्थानकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांनी हॉटेल बुकिंग रद्द केली असल्याने याचा मोठा फटका शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. गुरुवार, शनिवार, रविवार भाविकांची शिर्डीत होणाऱ्या मोठ्या गर्दीवर ही परिणाम झाला असल्याने शिर्डीतील सर्वच छोटे मोठे व्यावसायिक ही हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे. जे. रुग्णालयात घेतली कोविडवरील लस
हेही वाचा - दिलासा! एक एप्रिलपासून वीज दरात 2 टक्के कपात