ETV Bharat / state

अवैध खडी क्रशरचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण; नगरमध्ये गुंडांची दहशत - ahmednagar crime

पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात तहसीलदारांनी अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई केली. मात्र, यानंतर हे क्रशर पुन्हा सुरू झाल्याने त्याचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांचा गुडांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली आहे.

illegal stone crushers in ahmednagar
अवैध खडी क्रशरचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
author img

By

Published : Jan 15, 2020, 10:27 AM IST

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात तहसीलदारांनी अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई केली. मात्र, यानंतर हे क्रशर पुन्हा सुरू झाल्याने त्याचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांचा गुंडांनी पाठलाग केला. यानंतर खडी क्रशर चालक आणि त्याच्या गुंडांनी संबंधितांना बेदम मारहाण केली. त्यानंतर काही काळ डांबून ठेवले. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. खडी क्रशर चालक, वाळू माफिया, भूखंड माफिया या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या घटनेतून समोर आल्याची चर्चा परिसरात आहे.

अवैध खडी क्रशरचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

पारनेर तालुक्यातील पठारवाडी शिवारात अनधिकृत खडी स्टोन क्रशर सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी केली होती. यानंतर तहसीलदारांनी कारवाई करत खाडी क्रशर सील केले. मात्र चालकाने पुन्हा क्रशर सुरू केले. यांची माहिती बबन कवाद यांना मिळाली होती. त्याचे शूटिंग करण्यासाठी गेलेल्या मुलांना सिनेस्टाइल पाठलाग करून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. मात्र, अद्याप पारनेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप कवाद यांनी केला आहे.

Intro:अहमदनगर - अवैध खडी क्रेशरचे वचित्रीकरण करणाऱ्या दोन जणांना गुंडाकडून बेदम मारहाण..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_unligal_sand_crushar_pkg_7204297

अहमदनगर - अवैध खडी क्रेशरचे वचित्रीकरण करणाऱ्या दोन जणांना गुंडाकडून बेदम मारहाण..

अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील पठारवाडीत तहसीलदारानी सील केलेले अनधिकृत स्टोन क्रेशर पुन्हा सुरु झालेले पाहून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना पाहिल्यावर खडी क्रेशर चालक आणि त्याच्या गुंडानी पाठलाग करून दोन जणांना बेदम मारहाण करत डांबुन ठेवल्याची घटना समोर आलीय. मारहाणीचा प्रकार हा सीसीटीव्ही मधे कैद झाला आहे. खडी क्रेशर चालक, वाळू माफिया, भूखंड माफिया, अवैध व्यवसायानी सध्या अहमदनगर जिल्हात धुमाकूळ घातलाय. यावर पोलीस प्रशासनाचां कुठलाही धाक राहिलेला दिसत नसल्याचे या घटनेतुन समोर आलंय. पारनेर तालुक्यातील पठारवाडी शिवारात अनधिकृत खडी स्टोन क्रेशर सुरु असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी केली होती. त्या नंतर पारनेर तहसीलदार यांनी कारवाई करत खाडी क्रेशर सील केले होते. मात्र खडी क्रशर चालकाने पुन्हा सील तोडून हे खडी क्रशर सुरु केले. यांची माहिती बबन कवाद याना मिळाली होती. त्याचे शूटिंग करण्यासाठी गेलेल्या मुलांना सिनेस्टाइल पाठलाग करून मारहाण  करण्यात आली. या मारहाणीचे सी सी टिव्ही फुटेज असुन देखील पारनेर पोलिसां कडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कवाद यांनी केला आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर - अवैध खडी क्रेशरचे वचित्रीकरण करणाऱ्या दोन जणांना गुंडाकडून बेदम मारहाण..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.