ETV Bharat / state

सहा महिन्यांपासून थकले वेतन; २४ फेब्रुवारीला आझाद मैदानात राज्यस्तरीय आंदोलन - azad maidan latest agitation

गृहरक्षक दलाच्या जवानांना सणाच्या दिवशी कामावर घेतले जाते. यामुळे त्यांना उपजीविकेसाठी अर्धवेळ इतर ठिकाणी कामावर जावे लागते. जर कामावर गेले नाही तर काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तसेच मिळणारे वेतन तुटपुंजे आहे.

homeguards agitation on 24 february in azad maidan mumbai
सहा महिन्यांपासून पगार नाही; २४ फेब्रुवारीला आझाद मैदानात राज्यस्तरीय आंदोलन
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:38 AM IST

अहमदनगर - गृहरक्षक दलाच्या जवानांना मागील सहा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कामावर आले नाहीतर नोटीस दिल्या जातात, असा आरोप गृहरक्षक दलाच्या संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीला आझाद मैदानावर राज्यभरातील गृहरक्षक दलाचे जवान आंदोलन करणार असल्याची माहिती भारत चव्हाण यांनी दिली आहे.

सहा महिन्यांपासून पगार नाही; २४ फेब्रुवारीला आझाद मैदानात राज्यस्तरीय आंदोलन

गृहरक्षक दलाच्या जवानांना सणाच्या दिवशी कामावर घेतले जाते. यामुळे त्यांना उपजीविकेसाठी अर्धवेळ इतर ठिकाणी कामावर जावे लागते. जर कामावर गेले नाही तर काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तसेच मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या जवानांना कामाचा मोबदला मात्र, सहा-सहा महिने मिळत नाही. म्हणून याप्रश्नी शासनाने लक्ष देऊन त्वरित वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नाहीतर उपोषण, आंदोलन आणि प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'

सर्वोच्च न्यायालयाने गृहरक्षक दलाला राज्य सरकारने कायमस्वरूपी ३६५ दिवस काम द्यावे किंवा महिना साडेतीन हजार रुपये द्यावे, असा आदेश १० डिसेंबर २०१९ रोजी सरकारला दिला आहे. मात्र, शासनाने यासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. गृहरक्षक दलाच्या जवानांना कायमस्वरूपी वेतन आणि काम मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न सुटू शकतो.

Intro:अहमदनगर- सहा महिन्यांपासून पगारच नसल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांवर उपासमारीची वेळ.. २४ फेब्रुवारीला आझाद मैदानात राज्यस्तरीय आंदोलन..Body:अहमदनगर- राजेंद्र ट्रिम
Slug-
mh_ahm_01_homegard_shalary_issue_pkg_7204297

अहमदनगर- सहा महिन्यांपासून पगारच नसल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांवर उपासमारीची वेळ.. २४ फेब्रुवारीला आझाद मैदानात राज्यस्तरीय आंदोलन..

अहमदनगर- गृहरक्षक दलाच्या जवानांना मागील सहा महिन्यापासून पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कामावर आले नाहीतर नोटीसा दिल्या जातात असा आरोप गृहरक्षक दलाच्या संघटनेने जामखेड इथे आरोप करताना २४ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर राज्यभरातील गृहरक्षक दलाचे जवान आंदोलन करणार असल्याचे सांगितलंय..
गृहरक्षक दलाच्या जवानांना सणवार असेल तर कामावर घेतले जाते त्यामुळे त्यांना उपजिवीकेसाठी अर्धवेळ इतर ठिकाणी कामावर जावे लागते. जर कामावर गेले नाही तर काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तसेच मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागते व केलेल्या कामाचा मोबदला सहा सहा महिने मिळत नाही त्यामुळे याप्रश्नी शासनाने लक्ष देऊन त्वरित वेतन अदा करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली असून उपोषण, आंदोलन आणि प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
गृहरक्षक दलाच्या जवानांना कायमस्वरूपी वेतन व काम मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न सुटू शकतो. 
सर्वोच्च न्यायालयाने गृहरक्षक दलाला कायमस्वरूपी ३६५ दिवस काम द्यावे किंवा महिना साडेतीन हजार रुपये राज्य सरकारने द्यावे असा आदेश १० डिसेंबर २०१९ रोजी सरकारला दिले आहेत. परंतु शासनाने यासाठी सहा महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. गृहरक्षक दलाच्या विविध मागण्यांसाठी २४ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे होमगार्ड भारत चव्हाण यांनी सांगितले.

बाईट - 1)भारत चव्हाण -गृहरक्षक जवान
2) विठ्ठल जाधव -गृहरक्षक जवान

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- सहा महिन्यांपासून पगारच नसल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांवर उपासमारीची वेळ.. २४ फेब्रुवारीला आझाद मैदानात राज्यस्तरीय आंदोलन..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.