ETV Bharat / state

शिर्डी शहराच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाणी शिरले, साईनाथ रुग्णालयही पाण्यात

कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने वाहून आलेले पाणी शिर्डी शहराच्या पश्चिम भागात शिरले आहे. साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातही पाणी घुसले आहे.

शिर्डी
शिर्डी
author img

By

Published : Sep 13, 2020, 7:38 PM IST

Updated : Sep 13, 2020, 9:50 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्याचे पाणी शिर्डी शहराच्या पश्चिम भागात शिरले आहे. साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातही पाणी घुसल्याने लिप्ट, ओपीडी, केस पेपर काउंटर हा परिसर जलमय झाला असून पाणी काढण्याचे काम संस्थानकडून केले जात आहे.

शिर्डी

शिर्डी परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. गावातील बंधारे ओसंडून वाहत असून हे पाणी शहराच्या पश्चिम भागातील श्रीरामनगर, साईच्छानगर व आनंदनगरमधील लोकांच्या घरात शिरले आहे. या परिसरातील 60 ते 70 एकर क्षेत्रात असलेला मका, सोयाबीन शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातही पाणी शिरले असल्याने रुग्णालयाची लिप्ट, ओपीडी, केसपेपर काउंटर हा परिसरात जलमय झाला आहे. पाणी बाहेर काढण्याचे काम संस्थान कर्मचारी करत आहे.

हेही वाचा - आमदार देवयानी फरांदे कोरोनाबाधित, दुपारीच मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत दिले होते भाषण

साईनाथ रुग्णालयाजवळील वर्तुळाकार रस्ता फोडून हे पाणी मोकळ्या जागेत सोडण्यात आले. असून संस्थानच्या अग्निशमन बंबचा माध्यमातून हे पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केला जातोय मात्र पाण्याचा जोर कायम असल्याने हे पाणी शहरा बाहेर काढण्यासाठी मोठी अड़चन येत आहे. शिर्डीतील जुना लेंडी नाला सुरु करून त्याला मोठ्या ओढयाला जोडले तर भविष्यात अशी अड़चन पुन्हा येणार नाही.

हेही वाचा - महाराष्ट्राची बदनामी कदापि सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले

Last Updated : Sep 13, 2020, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.