अहमदनगर - ऐन थंडीत अवकाळी पावसाने शनिवारी उत्तर नगर भागातील श्रीरामपूर शहरासह वाकडी, गणेशनगर भागाला झोडपून काढले. संध्याकाळच्या सुमारास श्रीरामपूर शहरासह परिसरात पंधरा ते वीस मिनीटे रिमझीम पाऊस कोसळला.
हेही वाचा - अडचणींचा सामना करत हस्ताक्षर स्पर्धेत 'त्याने' मिळवला प्रथम क्रमांक
वाकडी आणि गणेशनगर परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ झाली. पावसामुळे शेतकऱ्यांनी वाळविण्यासाठी टाकलेले धान्यही भिजले.तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.