ETV Bharat / state

लग्नास दिला नकार... 'त्याने' तिच्या घरी जाऊन स्वत:ला घेतले पेटवून

सिद्धार्थचे शिर्डीतील एका तरुणीशी प्रेमसबंध होते. मात्र, नंतर तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे सार्थकने रागाच्या भरात गुरुवारी मुलीच्या घरी जाऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तो गंभीररित्या भाजला, त्याच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्वत:ला घेतले पेटवून
स्वत:ला घेतले पेटवून
author img

By

Published : Sep 18, 2020, 7:30 PM IST

अहमदनगर : शिर्डीतील एका तरुणीचे आणि नजीकच्या साकुरी येथील तरुणाशी प्रेमसबंध होते. मात्र, मुलीने लग्नास नकार दिल्याने तरुणाने गुरुवारी रागाच्या भरात मुलीच्या घरी जाऊन स्वत:ला जाळून घेतले आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीररित्या भाजला तर, तरुणीही जखमी झाली. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज (शुक्रवारी) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सार्थक बनसोडे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे.

माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी

शिर्डीजवळील साकुरी येथील सार्थक हा श्रीरामपूर तालुक्यातील एका महाविद्यालयात बीएससी नर्सिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे शिर्डीतील एका तरुणीशी प्रेमसबंध होते. मात्र, नंतर तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे सार्थकने रागाच्या भरात गुरुवारी शिर्डीतील मुलीच्या घरी जाऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकत स्वतःला पेटवून घेतले. तो इतक्यावरच थांबला नाही तर, त्यान त्या तरुणीला मिठी मारली. मात्र, ऐनवेळी मुलीचे वडील मधे आले आणि त्यांनी तिची सुटका केली. यात ती ३५ टक्के भाजली तर, तिचे वडीलही जखमी झाले. मात्र, सार्थक यात गंभीररित्या भाजला. त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत मुलीच्या वडिलांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सार्थकविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. मृत सार्थकच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात अजून कुठलीही तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली.

तरुणीचे फोटो आणि एक सुसाइड नोट सार्थकच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर घटनेच्या काही तास आधी अपलोड करण्यात आलेली आहे. त्याचाही तपास आता पोलीसांकडून करण्यात येत आहे. तर, या आठवड्यात प्रेमसबंधामुळे स्वत:ला संपवून घेत प्रेमिकेला जखमी केल्याच्या दोन घटना घडल्या असून यात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा - कांद्यासाठी धावून येणारे मागील सहा महिने कुठे होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.