ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये महिलांच्या केसांची ५ पोती चोरीला; टोळी गजाआड - ahmednagar crime news

जामखेडमध्ये महिलांचे केस असलेली पाच पोती चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीची चार पोती जप्त केली आहेत.

ahmednagar crime news
अहमदनगरमध्ये महिलांचे केस चोरणारी टोळी गजाआड
author img

By

Published : Feb 6, 2020, 10:41 AM IST

अहमदनगर - जामखेडमध्ये महिलांचे केस असलेली पाच पोती चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीची चार पोती जप्त केली आहेत. संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

अहमदनगरमध्ये महिलांचे केस चोरणारी टोळी गजाआड

सचिन तायप्पा वाघमोडे यांनी तक्रार दिली होती. यानुसार 31 जुलै 2019 रोजी राहत्या घरासमोरील पडवीतील महिलांच्या केसांची पाच पोती चोरीला गेल्याचे त्यांनी नमूद केले. याची किंमत जवळपास सहा लाख 30 हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यातील पाच आरोपी राम महादेव राठोड, बाळू यादव लोखंडे, विशाल बाळू लोखंडे, सागर बाळू लोखंडे, प्रकाश उर्फ पारस छगन काळे यांना अटक केली होती. तर सहावा आरोपी विकास मिलिंद घायतडक फरार होता.

मिलिंद घायतडक अरोळेवस्ती येथील झोपडपट्टीत आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार, जामखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने तीन दिवसांची आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान, घरात लपवून ठेवलेले 20 किलो महिलांचे केस पोलिसांनी जप्त केले आहेत.

Intro:अहमदनगर- फरार आरोपीसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल असलेले केस जप्त, आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_hire_theaf_arriest_pkg_7204297

अहमदनगर- फरार आरोपीसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल असलेले केस जप्त, आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी 
 
अहमदनगर- जिल्ह्यातील जामखेड मधे महिलांचे केस असलेल्या पाच पिशव्या चोरी प्रकरणी पोलिसांनी सहावा आरोपी जेरबंद करून त्याच्याकडून एक लाख रूपये किमतीच्या चार पिशव्या केस जप्त केल्या आहेत. सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन तायप्पा वाघमोडे (रा. अरोळेवस्ती, वैदुवाडी जामखेड) यांनी फिर्याद दिली की, दि. ३१ जुलै २०१९ रोजी राहते घरासमोरील पडवीत ठेवलेले महिलांचे केसांची पाच पिशव्या अंदाजे वजन १५० किलो, अंदाजे किंमत ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे चोरी गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यातील पाच आरोपी राम महादेव राठोड, बाळू यादव लोखंडे, विशाल बाळू लोखंडे, सागर बाळू लोखंडे, प्रकाश उर्फ पारस छगन काळे सर्व रा. झोपडपट्टी जामखेड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. तर सहावा आरोपी विकास मिलिंद घायतडक हा फरार होता. 
जामखेड पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, महिलांचे केस चोरी प्रकरणी सहावा आरोपी विकास मिलिंद घायतडक (रा. अरोळेवस्ती जामखेड) हा झोपडपट्टी अरोळेवस्ती येथे आला आहे. त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी विकास घायतडक यास ताब्यात घेतले व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याच्या घरात लपवून ठेवलेले २० किलो महिलांचे केस असलेले चार पिशव्या जप्त केल्या. 

बाईट- पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- फरार आरोपीसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल असलेले केस जप्त, आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.