ETV Bharat / state

Golden Crown Donated To Sai Baba: हैद्राबादच्या साईभक्ताकडून तब्बल 40 लाखांचा सूवर्ण मुकुट अर्पण, पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण

author img

By

Published : Jul 22, 2022, 3:19 PM IST

Updated : Jul 22, 2022, 5:11 PM IST

शिर्डी साईबाबांना ( Shirdi Sai Baba Temple ) आज हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त डॉ. रामकृष्ण यांनी साईबाबांना दान स्वरुपात सोन्याचा मुकुट दिला ( Golden Crown Donated To Sai Baba) आहे. पत्नी रत्नाम्मा यांची त्यांनी ईच्छापूर्ती केली आहे. से जमवण्यासाठी डॉ रामकृष्णा यांनी अमेरिकेत काम सुरु केले होते. अखेर अथक प्रयत्नांनी त्यांनी पत्नी रत्नाम्मा यांची ईच्छापूर्म केली आहे.

Sai Baba Devotee Dr Ramakrishna
साईभक्त डॉ. रामकृष्ण

शिर्डी - शिर्डी साईबाबांना ( Shirdi Sai Baba Temple ) आज हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त डॉ. रामकृष्ण यांनी साईबाबांना दान स्वरुपात सोन्याचा मुकुट दिला ( Golden Crown Donated To Sai Baba) आहे. खूपच आकर्षक मुकुट असून मुकुटावर डायमंडचा साज चढवण्यात आला असून ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकुटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आले आहे. हा मुकुट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार आज मध्यान्ह आरती दरम्यान साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात येत आहे.

साईबाबांना सुवर्ण मुकुट दान

पत्नीची शेवटची इच्छा - हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त डॉ. रामकृष्ण यावेळी सांगतात की, सन 1992 मध्ये ते सपत्नीक शिर्डीला साईबाबा दर्शनसाठी आले होते. यावेळी आरती दरम्यान मुकट चढवताना त्यांची पत्नी रत्नाम्मा यांनी पाहीले. तेव्हाच त्यांनी बाबांना असाच सोन्याचा मुकट चढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परिस्थिती अभावी तेव्हा ते शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात रत्नाम्मा यांचे निघन झाले. मात्र पत्नीची शेवटची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. यावेळी पैसे जमवण्यासाठी डॉ रामकृष्णा यांनी अमेरिकेत काम सुरु केले. पैशाची पुर्तता करुन ते भारतात आले व हैद्राबाद येथे बाबांसाठी सोन्याचा मुकट तयार करुन घेतला. ज्याचे वजन 742 ग्रॅम असल्याचे सांगत किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचे साईभक्त रामकृष्ण सांगीतले आहे.

इच्छापूर्तीचा आनंद - साईबाबांच्या इच्छे पुढे काहीच नसतं, आज वयाच्या 88 व्या वर्षी पत्नीची इच्छा पूर्ण करताना खूप आनंद होत असून संपर्ण जीवनात तिने मागीतलेल हे मागणं मी पूर्ण करत आहे. माझी दोन मुल आणि दोन मुली यांच्यासोबत आज बाबांच्या दरबारात हे दान देत असल्याचे डॉ. रामकृष्णा यांनी अगदी भावूक होत सांगीतले.

सोन्याच्या दानाची प्रक्रिया - शिर्डी साईबाबांना येणारे गुप्तदान सोने-चांदी रुपये पैसे हे मंदिरातील दानपात्रात टाकले जाते. त्याच बरोबर देणगी कौऊंटरवर देखिल भाविक दान करुन रीतसर पावती घेतात. सोने चांदीचे मोठे दान जसे मुकुट,सवर्ण हार, भांडी, मंदिरातील वापण्याच्या वस्तू, अशा दानाचे साईसंस्थान टाकसाळ कढून मूल्यांक करते. यात घडवण्याची मजुरी धरत नाही. फक्त मूळ सोन्याची किमंतीचे दानात जमा करतात.

हेही वाचा - First Transgender Corporator In Kolhapur: राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

Last Updated : Jul 22, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.