ETV Bharat / state

Pramod Sawant paid visit to Shirdi : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहपरिवार शिर्डी साई बाबांचे घेतले दर्शन - Pramod Sawant paid visit to Shirdi

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सहपरिवार शिर्डीत ( Pramod Sawant paid a visit to Shirdi Sai Baba ) येऊन साईबाबांच्या मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. आज वाढदिवस असल्याने आपण सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Sawant paid a visit to Shirdi Sai Baba
शिर्डी साई दर्शन प्रमोद सावंत
author img

By

Published : Apr 24, 2022, 2:13 PM IST

Updated : Apr 24, 2022, 2:31 PM IST

अहमदनगर - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सहपरिवार शिर्डीत ( Pramod Sawant paid a visit to Shirdi Sai Baba ) येऊन साईबाबांच्या मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. आज वाढदिवस असल्याने आपण सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. यावेळी सावंत यांनी सहपरिवार साईबाबांची पूजा आणि आरतीही केली. दरम्यान साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सावंत यांचा साईबाबा मूर्ती व शॉल देवून सन्मान करण्यात आला.

माहिती देताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

हेही वाचा - Prithviraj Patil : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील साईचरणी नतमस्तक

साईबाबांच्या दर्शनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, सबका साथ सबका विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिजन आहे. मोदींवर विश्वास ठेवून देश पुढे जात असून नवभारत निर्माण होत आहे. देशात मोदी कोणाबरोबर राजकारण करत नाही. विकासासाठी मोदी राजकारण करत असल्याचे सावंत म्हणाले.

गोव्याच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी प्रमोद सावंत यांनी शिर्डीत येऊन साईंना आपल्या विजयाचे साकडे घातले होते. त्यानंतर निवडणुकीत त्यांच्या वियजासह गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रमोद सावंत यांनी शिर्डीत येऊन नवसपूर्ती करत साईंचा सहपरिवार आशिर्वाद घेतला. यावेळी शिर्डीतील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सावंत यांचे शिर्डीत स्वागत केले.

हेही वाचा - Shirdi Saibaba Sansthan: शिर्डी संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहुल जाधव यांची नियुक्ती

Last Updated : Apr 24, 2022, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.