ETV Bharat / state

Four Prisoners Escaped From Prison : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 'फिल्मी स्टाईल'नं चार कैदी कारागृहातून फरार - गंभीर गुन्ह्यातील आरोपी

Four Prisoners Escaped From Prison : संगमनेर शहर कारागृहाचे गज कापून बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. परिणामी आता सर्वच पोलिसांची झोप उडाली आहे.

Four Prisoners Escaped From Prison
Four Prisoners Escaped From Prison
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 10:15 AM IST

Updated : Nov 8, 2023, 1:39 PM IST

स्वाती भोर, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर

संगमनेर Four Prisoners Escaped From Prison : संगमनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. संगमनेर शहर कारागृहाचे गज कापून बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडलीय. रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिल्मी स्टाईलने काढला पळ : संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहात सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. 7 नोहेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यात यशस्वी ठरले. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले अत्याचारामधील आरोपी रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव हे आरोपी पळून गेले आहेत. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्तावरील पोलिसांचं दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्यानं गाणे आणि आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबलेली होती. जेल तोडून हे कैदी या कारमध्ये बसून पसार झाले. कारागृहातून कैदी पळाल्यानं संगमनेर जेल प्रशासनाची इभ्रत पुन्हा चव्हाट्यावर आलीय.

"गज कापून या आरोपींनी पलायन केलंय. याप्रकरणी आम्ही तपास करत आहोत. यासाठी पाच पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत." - स्वाती भोर, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर

पोलिसांसमोर आव्हान : शहर पोलीस ठाण्याचा शेजारील जेलमधील आरोपी पळून गेल्यानं पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जेलमधील आरोपींकडे अँड्रॉइड मोबाईल होता, अशी माहिती उपलब्ध झालीय. हा मोबाईल त्यांना कोणी पुरवला त्यांना घेऊन जाणारं वाहन कोणाचं होतं. बंदोबस्ताला तीन पोलीस असतानाही हे आरोपी पळून कसे गेले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. जेलमधून कैदी पळून गेल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित पोलीस पथकं तयार करून नाशिक व इतर 3 ठिकाणी पाठविले. पळून गेलेले आरोपी हे गंभीर गुन्ह्यातील असल्यानं त्यांना पुन्हा पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय.

हेही वाचा :

  1. Nagpur Crime : उपराजधानीत 84 जिवंत काडतुसांसह नऊ पिस्तुल जप्त, दोन तस्करांना ठोकल्या बेड्या
  2. Raid On Cricket Match Betting : क्रिकेट वर्ल्डकप; नेट केबलच्या कार्यालयातील सट्टेबाजांवर पोलिसांची धाड
  3. Live Sex App Case : केवळ हजार रुपयात ॲपवरून लाईव्ह सेक्सचा आनंद; दोन तरुणींसह तरुणाला फ्लॅटमधून अटक

Last Updated : Nov 8, 2023, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.