ETV Bharat / state

मोटरसायकल-ट्रकच्या अपघातात चार जण जागीच ठार

या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले तर एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

accident
accident
author img

By

Published : Dec 9, 2020, 4:11 PM IST

अहमदनगर - नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पवार वाडी जवळ नगर-दौंड मार्गावर आज सकाळी 11च्या सुमारास ट्रॅकटरट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघात चार दुचाकीस्वार ठार झाले आहेत.

तिघे जागेवरच ठार

या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले तर एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. राज पवार, विशाल सोनवणे, राहुल बरकडे यांचा जागीच मृत्यू झाला तर, प्रतिक शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे. अपघात झालेले तरुण असून सर्वजण आई-वडिलांना एकूलताएक असल्याने श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम, अपघाताला निमंत्रण

नगर-दौंड राष्ट्रीय महामार्ग निर्माणाचे काम सुरू आहे, अनेक ठिकाणी सध्या काही काम अर्धवट अवस्थेत आहे, रस्त्यावर वाळू-चर, खडी पसरलेली असते, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या परस्थितीत दुचाकी चालकांना अनेक अडचणी येतात, दुचाकी कुठे घसरेल याची शाश्वती नसते. आज झालेला अपघात यातूनच झालेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, ट्रॅकटरला ओव्हरटेक असताना समोरून ट्रक आला, मात्र यात दुचाकी रस्त्यावर खडी असल्याने दुचाकी घसरली आणि ट्रक आणि ट्रॅटर खाली हे चारही तरुण चिरडले गेले, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.