अहमदनगर - श्री राम हे आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. राम मंदिरासाठी अर्थात योग्य विषयासाठी हे आंदोलन झाले होते आणि त्यात दोषारोप ठेवलेल्या सर्वांना सीबीआय न्यायालयाने निर्दोष घोषित करणे, हा आपल्या संस्कृतीचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते तथा माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांनी दिली.
विशेष सीबीआय न्यायालयाने आज बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी निर्णय देताना रथयात्रा आणि आंदोलनात सहभागी असणाऱ्या सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - LIVE : खटल्याची २८ वर्षे; अडवाणी-जोशींसह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता!
गांधी म्हणाले की, देशातील कोट्यवधी जनतेची श्रद्धा श्री रामावर आहे. अयोध्येत श्री राम मंदिर व्हावे यासाठी हा श्रद्धेचा लढा होता आणि ती एक जनभावना होती. सर्वोच्च न्यायालयाने पण यावर शिक्कामोर्तब केले असून अयोध्येत श्री राम मंदिराचे निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यावेळी झालेली रथयात्रा आणि त्याला जोडून झालेल्या घटनांमध्ये ज्यांना आरोपी केले होते, त्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे.