ETV Bharat / state

किरकोळ कारणावरून दहशत पसरविणाऱ्यांविरोधात लोणीत गुन्हा दाखल - अहमदनगर क्राइम न्यूज मराठी

कोल्हार परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाकडून एका छोट्या मुलीला धक्का लागण्याचे कारण झाले. त्यात या तरुणाला मारहाण झाली. या घटनेचे पडसाद गुरुवारी सकाळी उमटले व गावातील एका समूहाने पुन्हा या तरुणाला राहतो त्या वस्तीत जाऊन व तेथे राहणार्‍या अनेकांना मारहाण केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Sep 24, 2021, 4:59 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यातील कोल्हार येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडलीय. बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही गटावर परस्पर रात्री उशिरा लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दोन्ही गटावर गुन्हा दाखल

याबाबत मिळालेली माहिती अशी, की कोल्हार परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाकडून एका छोट्या मुलीला धक्का लागण्याचे कारण झाले. त्यात या तरुणाला मारहाण झाली. या घटनेचे पडसाद गुरुवारी सकाळी उमटले व गावातील एका समूहाने पुन्हा या तरुणाला राहतो त्या वस्तीत जाऊन व तेथे राहणार्‍या अनेकांना मारहाण केली आहे. या समूहाने यावेळी हातात तलवारी व लाकडी दांडके घेऊन दहशत पसरवली. या घटनेनंतर दोन्ही गटावर परस्पर रात्री उशिरा लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की येथील एका तरुणाचा छोट्या मुलीला धक्का लागला. त्यावरून वाद झाला, तो समझोत्याने मिटलाही. मात्र काही जणांनी राग मनात धरून मारहाण व दमबाजी केली. संबंधित घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. याप्रकरणी भादंवि 354, 452, 143, 147, 149 आणि आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.