ETV Bharat / state

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा बंद चारा छावणीशी संबंध नाही; जिल्हा प्रशासनाचा खुलासा - प्रसिद्धी पत्रक

नगर तालुक्यातील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर यांनी आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. परंतु, या आत्महत्येचा चारा छावणीशी संबंध नसल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा बंद चारा छावणीशी संबंध नाही
author img

By

Published : Aug 3, 2019, 4:52 PM IST

अहमदनगर - नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर यांनी आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही आत्महत्या बंद चारा छावणी पुन्हा सुरू करावी, यासाठी झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी केला. तर याबाबत माध्यमात बातम्या येताच जिल्हा प्रशासनाने स्वतःचा बचाव करत वसंत झरेकर यांच्या आत्महत्येचा चारा छावणीशी संबंध नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा बंद चारा छावणीशी संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा खुलासा

या आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून, नगर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात जमले आहेत. चारा छावण्यास परवानगी न देणाऱ्या आणि आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हत्येचे गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्महत्या केलेल्या वसंत झरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच प्रशासनाने दबाव आणल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत शेतकऱ्याचा अंत्यविधी करू, असा इशारा शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी दिला आहे.

झरेकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. दोन दिवसापूर्वीच छावण्या सुरू करण्याची मागणी करण्यासाठी झालेल्या आंदोलनात वसंत झरेकरसुद्धा सहभागी झाले होते. त्याचवेळेस त्यांनी बंद चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करत प्रशासनाप्रती संतप्त भावना व्यक्त केली होती. अखेर आज त्यांनी आत्महत्या केली.

Intro:अहमदनगर- बंद चारा छावणी प्रकरणी शेतकऱ्याची आत्महत्या तर या आत्महत्याचा चारा छावणीशी संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा खुलासा..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_cattel_camp_suicide_bite_7204297
mh_ahm_01_cattel_camp_suicide_vij_7204297

अहमदनगर- बंद चारा छावणी प्रकरणी शेतकऱ्याची आत्महत्या तर या आत्महत्याचा चारा छावणीशी संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा खुलासा..

अहमदनगर- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरीवसंत सदाशिव झरेकर यांनी आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही आत्महत्या बंद चारा छावणी पुन्हा सुरू करावी यासाठी झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी केला आहे. याबाबत माध्यमात बातम्या येताच मात्र जिल्हा प्रशासनाने स्वतःचा बचाव करत वसंत झरेकर यांच्या आत्महत्येचा चारा छावणीशी संबंध नसल्याचे पसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून नगर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात जमले आहेत. चारा छावण्यास परवानगी न देणाऱ्या आणि आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱयांवर हत्येचे गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्महत्या केलेल्या वसंत झरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही तसेच प्रशासनाने दबाव आणल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर मृत शेतकऱ्याचा अंत्यविधी करू असा इशारा शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी दिला आहे. झरेकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. दोन दिवसापूर्वीच झालेल्या छावण्या सुरू करण्याची मागणी करण्या साठी झालेल्या अंदोलनात वसंत झरेकर सुद्धा सहभागी झाले होते. आणि त्याच वेळेस त्यांनी बंद चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी करत आंदोलना दरम्यान संतप्त भावना प्रशासनाप्रति व्यक्त केली होती.. अखेर आज त्यांनी आत्महत्या केली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- बंद चारा छावणी प्रकरणी शेतकऱ्याची आत्महत्या तर या आत्महत्याचा चारा छावणीशी संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा खुलासा..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.