शिरूर - तालुक्यातील दीपक करगल या शेतकऱ्याने शिर्डी साईबाबा संस्थानला केशर आंबे देणगी दिले आहेत. या आंब्याची किंमत सुमारे 25 लाख इतकी आहे. कोरोना काळातील साई संस्थानला अन्नदानातील हे सर्वात मोठे दान मिळाले, अशी प्रतिक्रिया साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.
साईबाबा संस्थानने शेतकऱ्याचे मानले आभार
शिरूर तालुक्यातील शेतकरी तसेच शिर्डी साईबाबांचे परमभक्त दीपक करगल यांनी आपल्या आंब्याच्या शेतीतील तब्बल 2500 किलो केशर आंबे आज साई संस्थानला देणगी म्हणून दिले. साईबाबा संस्थानच्या वतीने उभरण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसह, साईबाबा आणि साईनाथ रुग्णलयातील रुग्णांबरोबर परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमांनाही साई संस्थानाकडून दररोज मोफत जेवण दिले जाते. यामध्ये वरण-भात, दोन भाज्या आणि चपाती असते. तसेच, आता दीपक करगल यांच्याकडून केशर आंबे देणगी म्हणून मिळाले आहेत. आता या कोविड सेंटरमधील लोकांसह परिसरातील अनाथाश्रम, वध्दाश्रमांनाही या आंब्याच्या रसाचे जेवण मिळणार आहे.
हेही वाचा - परभणीत इंधनाचा सर्वाधिक दर; पेट्रोल 102.57 तर डिझेल 93.4 रुपये प्रतिलिटर