अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळेही बंद आहेत. याचा परिणाम झेंडू फूल उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीतील 10 हजार झेंडूचे झाडे उपटली आहेत.
हेही वाचा - कोरोनामुळे झेंडूना मिळेना बाजार, बळीराजा झाला बेजार
धार्मिक स्थळे बंद असल्याने शेतकऱ्यांच्या झेंडूला मागणी राहिली नाही. यामुळे झेंडू फुल उत्पादकांवर मंदीचे सावट आले. संगमनेर तालुक्यातील राजेंद्र वाकळे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील तब्बल दहा हजार झेंडूची झाडे उपटून फेकून दिली आहेत. ही फुल शेती उभी करण्यासाठी त्यांनी दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, आता कोरोनामुळे फुलांना मागणी नसल्याने त्यांनी तीनशे रुपये रोजाने मजूर लावून फुलांची झाडे काढून टाकली आहेत.