ETV Bharat / state

पंढरीची वारी एक दिवस 'पोलीस ठाण्यात' मुक्कामी; चाळीस वर्षांची परंपरा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर येथून ही पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघते. वाटेत एका दिवसाच्या मुक्कामासाठी नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात थांबते.

वारकऱ्यांची सेवा करताना पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Jul 2, 2019, 5:34 PM IST

अहमदनगर- 'जाता पंढरीसी, सुख वाटे जिवा.. आनंदे केशवा, भेटतासी' असे म्हणत प्रत्येक वारकरी जागो-जागी मुक्काम करत पंढरीच्या वाटेवर चालत असतो. अशीच एक दिंडी पंढरपूरच्या वाटेवर असताना एक दिवस चक्क पोलीस ठाण्यात मुक्कामी राहते. गेल्या 40 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.

वारकऱ्यांच्या सेवेत पोलिस कर्मचारी दंग

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर येथून ही पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघते. वाटेत एका दिवसाच्या मुक्कामासाठी नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात थांबते. ही परंपरा गेल्या 40 वर्षांपासून अखंड सुरू आहे. वै. पुरुषोत्तम महाराजांची दिंडीचा हा नववा मुक्काम असतो. पोलीस ठाण्यापासून तीन किलोमीटर अंतरावर एमआयडीसी पोलीस सिद्धेश्वर दिंडीच्या स्वागताला हजर राहतात.

पोलीस दिंडीतील वारकरी होऊन सन्मानाने दिंडीला पोलीस ठाण्यात घेऊन येतात. यावेळी पोलीस वसाहतीतील महिलावर्ग पालखीला पंचारतीने ओवाळताता आणि महिला वारकऱ्यांना हळदीकुंकू लावत त्यांचे स्वागत करतात. पोलीस ठाण्यात दिंडीच्या आगमनानंतरचे वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन जाते. खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे वारकरी होऊन जातात. कपाळावर भागवत धर्माचा टिळा, गळ्यात टाळ घेऊन त्यांची पाऊले हरिपाठ आणि कीर्तनात दंग होऊन हरिनामाच्या गजरावर थिरकतात.

गेल्या चाळीस वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यानंतर काही नवीन कर्मचारी आले. मात्र, सिद्धेश्वराची पालखीचा एक दिवसाचा मुक्काम अजूनही या पोलीस ठाण्यात राहतो.

प्रत्येक दिंडी, पायी वारी सोहळ्यातील वारकरी विठू माऊलीच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आसुसलेला असतो. वाटेत मुक्काम करत तो पंढरपूरकडे मार्गक्रमण करतो. मात्र, काही जणांना वारीचा अनुभव इच्छा असूनही घेता येत नाही. म्हणून पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्या रूपातच विठ्ठलाला पाहण्याचा आनंद अनेकजण घेतात. हाच आनंद अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गेल्या चाळीस वर्षांपासून नित्यनियमाने घेत आहेत.

Intro:अहमदनगर- पंढरीची वारी एक दिवस पोलीस ठाणे मुक्कामी.. चाळीस वर्षांची परंपरा.
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_police_serv_dindi_7204297

अहमदनगर- पंढरीची वारी एक दिवस पोलीस ठाणे मुक्कामी.. चाळीस वर्षांची परंपरा.

अहमदनगर- 'जाता पंढरीसी, सुख वाटे जिवा.. आनंदे केशवा, भेटतासी'.. पंढरीच्या वाटेवर असलेल्या प्रत्येक दिंडी,पायी वारी सोहळ्यातील वारकरी सध्या विठू माऊलीच्या प्रत्येक्ष भेटी साठी आसुसलेला आहे आणि पंढरपूर कडे मार्गक्रमण करत आहे.. पण प्रत्येकालाच वारीचा अनुभव इच्छा असूनही घेता येत नाही. आणि म्हणूनच पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्या रूपातच विठ्ठलाला पाहण्याचा आनंद अनेकजण घेतात. हाच आनंद अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गेल्या चाळीस वर्षां पासून नित्यनियमाने घेत आहेत..

व्हीओ1- मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वरयेथून येणार्या पाई दिंडी सोहळ्याचा एक मुक्काम चक्क पोलीस ठाण्यात असतो.. आणि ही परंपरा गेली चाळीस वर्षां पासून अविरत सुरू आहे.. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराजांची दिंडीचा नऊवा मुक्काम असतो तो
अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात.. आणि हा योग खाकीवर्दीतील पोलिसातील वारकर्या साठी विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला.. या प्रमेया नुसार असतो. त्यामुळेच पोलीस ठाण्यापासून तीन किलोमिटरवर एमआयडीसी पोलीस सिद्धेश्वर दिंडीच्या स्वागताला हजर राहतात आणि दिंडीतील वारकरी होऊन सन्मानाने दिंडीला पोलीस ठाण्यात घेऊन येतात.. यावेळी पोलीस वसाहतीतील महिलावर्ग पालखीला पंचारतीने ओवाळत आणि महिला वारकऱ्यांना हळदीकुंकू लावत स्वागत करतात..
बाईट- दिंडी प्रमुख महाराज

व्हीओ2- पोलीस ठाण्यात दिंडीच्या आगमना नंतरचे वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन खाकीवर्दीतील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हा वारकरी होऊन जातो.. कपाळावर भागवत धर्माचा टिळा, गळ्यात टाळ घेऊन त्याची पाऊले हरिपाठ आणि कीर्तनात दंग होत हरिनामाच्या गजरावर थिरकतात..
बाईट- पोलीस अधिकारी

व्हीओ3- गेली चाळीसवर्षं ही परंपरा अविरत आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदलून आले आणि गेले, मात्र सिद्धेश्वर पालखी सोहळ्याचा एक मुक्काम याच पोलीस ठाण्यात राहिला आणि पोलिसवर्दीतील वारकरी हरिनामाच्या गजरात वारीशी एकरूप राहिला.. अवघ्या समाजाला जोडून घेण्याचे काम माऊलीने पंढरीच्या वारीच्या निमित्ताने करून घेतले, त्याचाच एक प्रत्येय माऊलीच्या प्रेमात कैद असलेले वारकरी-पोलीस यानिमित्ताने करून देतात..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पंढरीची वारी एक दिवस पोलीस ठाणे मुक्कामी.. चाळीस वर्षांची परंपरा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.