ETV Bharat / state

Loudspeakers On Sai Mandir Shirdi : भोंगा वादामुळे शिर्डीच्या साईबाबांची काकड आरती बंद करु नका, जामा मशिद ट्रस्टची पोलिसांकडे मागणी - शिर्डी मुस्लिम समुदाय

मनसेने राज्यात मशिदींवरच्या भोंग्यांविरुद्ध आंदोलन सुरु केल्याने त्याचा फटका शिर्डीतील साईबाबांच्या रात्रीची व पहाटेच्या आरतीलाही बसला आहे. साईबाबांची आरती लाऊडस्पीकरशिवाय करण्यात ( Shirdi Kakad Aarti Without Loudspeaker ) आली. यावर आता शिर्डीतील मुस्लिम समुदायाने ( Muslim Community Shirdi ) साईबाबांची काकड आरती व रात्रीची आरती लाऊडस्पीकरवर लावण्यास परवानगी देण्याची मागणी केली ( Dont Turn Off Sai Mandir Loudspeakers ) आहे.

Muslim community demands police
मुस्लिम समाजाची पोलिसांकडे मागणी
author img

By

Published : May 5, 2022, 7:25 AM IST

Updated : May 5, 2022, 11:45 AM IST

शिर्डी ( अहमदनगर ) : भोंगावादामुळे काल साईमंदिरातील रात्रीची व पहाटेची आरती व मशिदीवरील अजान लाऊडस्पीकर शिवाय ( Shirdi Kakad Aarti Without Loudspeaker ) झाली़. दरम्यान साईबाबांच्या मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू ( Dont Turn Off Sai Mandir Loudspeakers ) नका, अशी मागणी येथील मुस्लीम समुदायाने केली ( Muslim Community Shirdi ) आहे़. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच श्रीसाईबाबा मंदिरातील रात्रीची व पहाटेची आरती लाऊडस्पीकर शिवाय झाली. याशिवाय सर्व मशिदीत नमाज झाली. परंतु अजानसाठी स्पिकरचा वापर करण्यात आला नाही.

याबाबत शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या की, आम्हाला पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे़. त्यात न्यायालयाच्या निर्देशानूसार ( Supreme Court Orders On Loudspeaker ) काही विशिष्ठ निर्देशाचे उल्लंघन करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे़. त्यानुसार न्यायालयाचे आवाज मर्यादेसंबधी निर्देश आहेत, त्याचे पालन करून साईमंदिरातील सर्व आरत्या पुजाविधी नियमीत व सुरळीत सुरू आहेत़.

मुस्लिम समाजाची पोलिसांकडे मागणी

साईमंदिरावरील लाऊडस्पीकर ( Loudspeakers On Sai Mandir Shirdi ) बंद न ठेवता पुर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी येथील जामा मशिद ट्रस्ट व मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे़. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती लाऊडस्पीकर शिवाय झाली. हे अतिशय वेदनादायक आहे़. साईबाबा देवस्थान हे जागतीक किर्तीचे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे़.

साईबाबांच्या द्वारकामाई मशिदीवर गेली सव्वाशे वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेला हिरवा व भगवा ध्वज एकत्रित लावला जातो़. रामनवमी उत्सवात रामजन्माच्या कार्यक्रमाबरोबरच संदलचीही मिरवणूक असते़. रोज सकाळी दहा वाजता हिंदू- मुस्लीम एकत्रितपणे साईसमाधीवर फुले वाहतात़. येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याला या भोंगावादाने गालबोट लागणे योग्य नाही़.

देश-विदेशातून भाविक शिर्डीत येतात़ मंदिरावर पंचक्रोशितील हजारो नागरिकांची रोजीरोटी अवलंबून आहे़. या जागतिक किर्तीच्या देवस्थानावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता ते पूर्ववत सुरू ठेवावे व विशेष बाब म्हणून त्यास मान्यता देण्यात यावी़. निवेदनावर जामा मशिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार, सचिव बाबाभाई सय्यद, रज्जाकभाई शेख, नसीरभाई दारूवाले, पठाण भाई, मेहमुदभाई सय्यद, सरदारभाई पठाण, मौलाना मंसुर सय्यद, मौलाना अन्वर शहा, हाजी शमशुद्दीन, हनीफभाई सय्यद, गनीभाई पठाण, सलीमभाई शेख, हाजी सादीक इनामदार, शफिक शेख, शेख असफअली, हाजी अली पठाण, मेहमुद सय्यद, समीर शेख, जावेद शेख, अ‍ॅड. सुलेमान सय्यद, अमीरभाई शेख आदींची नावे आहेत़.

हेही वाचा : Actor Sonu Sood : सोनू सूद शिर्डीत लवकरच उघडणार वृद्धाश्रम; 'कोट्यवधी कमवण्यापेक्षा जास्त आनंद पाच लोकांच्या मदतीत'

Last Updated : May 5, 2022, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.