ETV Bharat / state

Saibaba Donation Counting: तीन दिवसात साईबाबांना तब्बल 4 कोटीचे दान.. 3 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन - मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत

शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत भाविकांनी रामनवमीच्या ( Shirdi Ram Navami Utsav ) तीन दिवसात तब्बल ४ कोटींचे दान टाकले ( Four Crore Donation To Shirdi Saibaba ) आहे. याच दरम्यान ३ लाख भाविकांनी दर्शन ( 3 lakh devotees took Sai Darshan ) घेतले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत ( IAS Bhagyashri Banayat ) यांनी दिली आहे.

तीन दिवसात साईबाबांना तब्बल 4 कोटीचे दान.. 3 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन

author img

By

Published : Apr 15, 2022, 6:46 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) : साईबाबांच्या तीन दिवसीय रामनवमी उत्सव ( Shirdi Ram Navami Utsav ) काळात भाविकांनी तब्बल 4 कोटी 57 लाख रुपयांचे विक्रमी दान साई संस्थानला दिले ( Four Crore Donation To Shirdi Saibaba ) आहे. याच दरम्यान ३ लाख भाविकांनी दर्शन ( 3 lakh devotees took Sai Darshan ) घेतले. यातील खास दान म्हणजे विविध देशातील तब्बल 12 लाख रुपयांचे दानही विदेशी भाविकांनी दिले आहे. कोरोनानंतर नव्या आर्थिक वर्षात एप्रिल महीन्यातील हे पहिलं मोठं दान असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत ( IAS Bhagyashri Banayat ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली आहे.

१११ वा राम नवमी उत्सव : साईबाबांच्या शिर्डीत 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान 111 वा रामनवमी उत्सव साईबाबा संस्थानच्यावतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठल्यानंतर साजरा झालेला हा पहिला उत्सव असल्याने शिर्डीत जवळपास तीन लाखाच्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या तीन दिवस भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. भाविकांनी केलेल्या मोठ्या गर्दीने या तीन दिवसात साई चरणी विक्रमी दान टाकल. तीन दिवसात तब्बल 4 कोटी 57 लाखाची देणगी साई चरणी अर्पण केली आहे. यात रोख रक्कम ही 4 कोटी लाख 26 लाख इतकी आहे. याच बरोबरीने सोळा लाख रुपयाचे सोने तर चार लाख पन्नास हजाराची चांदी आणि अकरा लाख रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. उत्सवानंतर दान पेट्यातील रकमेची मोजदाद झाल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

शिर्डी झाली कुबेराची नगरी : शिर्डीचे साईबाबा, ज्यांनी आपली संपुर्ण हयात फकिरी वेशात व्यतीत करुन समाजात मानव कल्याणचा एक नवी मुहर्तमेढ रोवली. सबका मालिक एक है, या मुलमंत्राच्या आधारे सर्वजाती धर्मांना एका छताखाली आणले. या साईंच्या नगरीत सर्वधर्मिय भक्तगण एकत्र येवून बाबांना अब्जपती करत आहेत. साईंच्या दरबारी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या इच्छाशक्तीनुसार आपली श्रद्धा अर्पित करत असतो. भाविकांच्यामते बाबांना एका हाताने दिले तर बाबा हजारो हाताने भरभरुन देतात. याच धारणेमुळे काही हजारात स्थापन झालेल्या संस्थानकडे कोटींचे दान जमा झालेले आहे. ही सर्व रक्कम साई संस्थान सेवेतील कर्मचारी, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा, हॉस्पिटल, अन्नदान, निवासस्थाने त्याचबरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च करते. साईंचा महिमा आज जगभरात पोहचल्याने कधी काळी फकिराची नगरी म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता कुबेराची नगरी म्हणून ओळखली जावू लागली आहे.

हेही वाचा : 'सबका मलिक एक'चा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत दिसला हिंदू मुस्लीमचा एकतेचा नजारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.