ETV Bharat / state

"सोशल डिस्टंन्सिंग पाळून दिवे प्रज्वलित करण्याचा उपक्रम यशस्वी करा"

author img

By

Published : Apr 3, 2020, 8:45 PM IST

कोरोनाच्या संकटाचे सावट दूर करण्यासाठी सर्वानाच लढाई करावी लागत आहे. महसूल पोलीस आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी रात्रीचा दिवस करून या लढाईत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याकडे लक्ष वेधून विखे पाटील यांनी सांगितले की, या लढाईतील महत्वाचा टप्पा आता सुरू झाला असून, त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असे राधाकृष्ण आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

ahmadnagar corona
आमदार राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर- कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीला धैर्याने आणि संयमाने सामोर जावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाचा एकत्रितपणा दाखवून देण्यासाठी पंतप्रधानांनी सूचित केलेल्या दिवे प्रज्वलन उपक्रमाला सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून यशस्वी करावे, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनला ९ दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाईट बंद करून घराच्या अंगणात किंवा गॅलरीत मेणबती, पणती आणि मोबाईलचा फ्लॅश चमकवून दिवे लावण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. देशाची एकजूटता आणि देशातील जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी सूचित केलेला हा उपक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कुटुंबियांसमवेत यशस्वी करावा, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दिवे प्रज्वलित करण्यासाठी कोणीही रस्त्यावर येवू नये. यासाठी कोणतेही सामुहिक कार्यक्रम आयोजित न करता शिस्त, संयम आणि उपक्रमातील सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेऊनच प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा, असे विखे पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटाचे सावट दूर करण्यासाठी सर्वानाच लढाई करावी लागत आहे. महसूल पोलीस आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी रात्रीचा दिवस करून या लढाईत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याकडे लक्ष वेधून विखे पाटील यांनी सांगितले की, या लढाईतील महत्वाचा टप्पा आता सुरू झाला असून त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.

सोशल डिस्टंन्सिंग पाळून या लढाईत प्रत्येकाने योगदान द्यावे, गाव पातळीवर आरोग्याच्या दृष्टीने सर्वच उपाय योजना केल्या जात आहे. परंतु, मागणी प्रमाणे गाव पातळीवर सहकार्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे विखे पाटील म्हणाले. विजेचा वापर काटकसरीने करा. सध्या बहुतांश गावांमधून विजेचे रोहित्र बंद पडण्याच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देवून बंद पडलेले रोहित्र बदलून देण्याचा प्रयत्न आपण करत आहोतच, परंतु रोहित्र दुरुस्त करणारे कामगार हे बाहेरचे असल्याने रोहित्र दुरुस्त होण्यातील अडचणीत झालेली वाढ लक्षात घेवून शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढाच विजेचा वापर करावा. आणि रोहित्रावर अधिकचा भार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आमदार विखे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा- नेपाळमधील तबलिगी जमातीच्या १४ जणांना संमनेरमध्ये दिला आसरा; 5 जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.