शिर्डी (अहमदनगर) Diwali Donation To Shirdi : साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर म्हणाले की, दिनांक १० नोव्हेंबर ते दिनांक २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १७ कोटी ५० लाख ५६ हजार ८६ रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. यामध्ये रोख स्वरुपात रुपये ७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ दक्षिणा पेटीत प्राप्त झाली. देणगी काऊंटरवर ३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पास देणगी २ कोटी ३१ लाख ८५ हजार ६०० रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी. देणगी, मनी ऑर्डर ३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३ रुपये तर सोने ४२५.८१० ग्रॅम रक्कम रुपये २२ लाख ६७ हजार १८९ आणि चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्कम रुपये ०४ लाख, ४९ हजार ७३२ यांचा समावेश आहे.
झोळीत भरभरून दान : दिवाळीच्या दहा दिवसांच्या सुट्यांमध्ये शिर्डीच्या साई बाबांच्या झोळीत भरभरून कोट्यवधींचं दान आलंय. यंदा 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीतील दानपात्रांची मोजदाद करण्यात आलीय. यावेळी तब्बल साडे सतरा कोटींचं महादान प्राप्त झालंय. यात सोने-चांदी आणि रोख स्वरुपातील दानाचा समावेश आहे.
दर तीन दिवसाला हुंडींची मोजदाद : दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्यामध्ये साईबाबांच्या दरबारात येऊन लाखो भाविकांनी साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय. यात विदेशी भाविकांची संख्या लक्षणीय दिसून आलीय. यावेळी आलेल्या भाविकांनी बाबांच्या दर्शनानंतर येथील दानपात्रात भरभरून दान टाकलय. सोने-चांदी, तसंच रोख स्वरुपातील दानाचा समावेश आहे. शिर्डी साईंच्या दरबारात दर तीन दिवसाला हुंडीची मोजदाद होते. यावेळी सर्व कायदेशीर प्रणाली पूर्ण करत दानात आलेली रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकेत जमा केली जाते.
कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती : यंदाही या मोजदादमध्ये साईंना रेकॉर्डतोड दान आल्याचं समोर आलयं. १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संस्थानला रुपये १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा: