ETV Bharat / state

जामखेड पोलिसांकडून विधवा, गरीब मुस्लीम कुटुंबांना शिरखुर्मा किटचे वाटप - ramjan eid news

कोरोना महामारीमुळे इफ्तार पार्टीला फाटा देत जामखेड पोलीस स्टेशनच्यावतीने मुस्लीम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले.

jamkhed
गरीब मुस्लीम कुटुंबांना शिरखुर्मा किटचे वाटप
author img

By

Published : May 13, 2021, 9:17 PM IST

Updated : May 13, 2021, 10:32 PM IST

अहमदनगर- सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. सगळीकडे लाॅकडाऊन आहे. मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. कोरोना महामारीमुळे इफ्तार पार्टीला फाटा देत जामखेड पोलीस स्टेशनच्यावतीने मुस्लीम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले.

माहिती देताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

जामखेड पोलिसांचा सामाजिक दृष्टिकोन-

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून नवनवीन कल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील ट्रॅफिक जॅमचा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळला व रहदारीला चांगली शिस्त लावली. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैद्य धंद्यावर कारवाई केली. तसेच कोरोना महामारीमुळे रक्ताची गरज ओळखून जामखेड व खर्डा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले. यात सुमारे पाचशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. आता त्यांच्या संकल्पनेतून शहरातील मुस्लीम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. यामुळे या कुटुंबाचा रमजान चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे.

पोलीस स्टेशनमध्ये विधवा व गरीब कुटुंबास शिरखुर्मा किटचे वाटप करताना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक किरण कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, अजहर सय्यद, मुक्तार कुरेशी, संग्राम जाधव, अरुण पवार व मुस्लीम समाजातील नागरिक हजर होते.

हेही वाचा - स्मशनात जागा नाही! ख्रीस्ती धर्मीय रुग्णांच्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

Last Updated : May 13, 2021, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.