मुंबई : सध्या देशाचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाकडे. यामध्ये विषय सुरू आहे तो शिवसेना आणि संत्तासंघर्ष. आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असून ते शिसेनेतून बंड करून बाहेर पडले आता ते त्या पक्षाचे मुख्य नेते आहेत. हे सगळे राजकारण सुरू असताना यामध्ये भाजपलाही कायम टीकेचे धनी व्हाले लागले आहे. कारण ते सत्तेत आहेत. दरम्यान, अलिकडच्या काळात शत्रूत्व वाढले आहे. ते कमी करावे लागेल असे म्हणत उद्धव ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे आमचे शत्रू नाहीत ते आमचे वैचारिक विरोधक आहेत अशी प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पहाटेच्या शपतविधी बाबत मी जे वक्तव्य केल होत ते खर होत आहे. आणि खरही ठरतय. तसेच, हळू-हळू असेच गोफ्यस्फोट होतायेत ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अद्याप अर्ध्याच गोष्टी कळाल्या आहेत. मी काहीही बोललो की समोरुन काही गोष्टी बोलली जाते. त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. अशाच हळु-हळु सगळ्या गोष्टी बाहेर येतील अस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणी येथे आयोजीत केलेल्या दोन दिवसीय महसुल परीषदेच्या समीरोप केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना म्हटले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दररोज एका नेत्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातोय. राष्ट्रवादीमध्ये एक पध्दत आहे, ते भावी पंतप्रधान भावी मुख्यमंत्री म्हणून अशा अनेक गोष्टी सांगत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. बघा माझ्या अनुभवातून मी शिकलो काहीही कधीही होवू शकत. आता उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील अस कोणाला वाटले होते का? मात्र ते झाले. त्यामुळे ज्याला-ज्याला जो जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहेत असे म्हणत फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुणे पोटनिवडणुकीवर फडणवीस यांचे वक्तव्य : मागच्या सगळ्या निवडणूकात सीएम आणी डिसीएम प्रचाराला गेले होते. शरद पवारांपासून सगळे नेते निवडणूक प्रचारात उतरवलेत. याचा अर्थ त्यांना काही वेगळे दिसत असेल म्हणून, उतरवले ना? या पुर्वीच्या कोणत्या पोटनिवडणुकीत पवार साहेब गेले होते ? असे म्हणत प्रत्येक निवडणूर गांभिर्याने घ्यावी लागते असही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
येत्या काळात आपल्याला जगाशी स्पर्धा करायची : जलयुक्त शिवार या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यातील २८ हजार गावांमध्ये या योजनेमुळे परिवर्तन झाले आहे. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाचे कामही महसूल विभागाने 'मिशन मोड'वर केले. म्हणून अशक्य वाटणारा हा महामार्ग प्रत्यक्षात कमी कालावधीत साकार होत आहे. येत्या काळात आपल्याला जगाशी स्पर्धा करायची आहे. त्यासाठी राज्यात उद्योग आले पाहिजेत. उद्योगांना लागणारी जमीनीची 'एनए' प्रक्रिया सहज व सुलभ झाली पाहिजे अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा : संजय राऊत स्किझोफ्रेनियासारख्या आजाराने ग्रस्त - श्रीकांत शिंदे