शिर्डी (अहमदनगर) Devendra Fadnavis drama : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक दौऱ्यानंतर दिल्लीला जाण्याआधी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर साईबाबांकडे काय मागितलं या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना राजकारणातील स्वाभिमानी (मी) व्यक्ती साईबाबांच्या चरणी काय प्रार्थना करणार? सध्या महाराष्ट्रावर असलेलं संकट दूर व्हावं. महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा. राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी राज्यात चांगलं सरकार यावं, अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. (Sanjay Raut Shirdi)
त्यावेळी शिंदे गोधडीत होते : आम्ही ठाकरे गट वगैरे म्हणत नाही. आम्ही शिवसेना म्हणतो. शिवसेना स्थापन करायला एकनाथ शिंदे कुठे गेले होते? 55 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेना स्थापन केली होती का? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलीय. त्यावेळी एकनाथ शिंदे गोधडीत होते, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर करत शिवसेना ही बाळासाहेबांची असल्याचं म्हटलं आहे.
श्वेतपत्रिका काढण्याची मागणी योग्य : 'शासन आपल्या दारी' याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी योग्य आहे. 'शासन आपल्या दारी' त्या निमित्तानं होणारा वारेमाप खर्च हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
आमदार अपात्रता निकाल : सुप्रीम कोर्टानं न्यायदानाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ते सो कॉल्ड न्यायाधीश आहेत. न्याय देणारे काल मुख्यमंत्र्याकडे गेले. बंद दाराआड चर्चा केली ते फुटताना दिसतायेत. न्याय देणारेच आरोपीकडे चहा पित असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलयं.
महानंद एनडीबीटी : तुम्ही इथे इतके वर्ष डोक्यावरील केस उपटत होता का? महानंद ही दूध क्षेत्रातील महत्त्वाची संस्था ती तुम्हाला चालवता आली नाही. सरकारची संस्था तुम्ही चालवत नाही. खासगी डेअरी व्यवस्थित चालविण्यासाठी तुम्हाला महानंद संस्था बुडवायची आहे. त्याचं कारण संस्थेची मुंबईतील सत्तावीस एकर जागा तिच्यावर अनेकांचा डोळा आहे. महाराष्ट्रातील संस्था महाराष्ट्राच्याच ताब्यात राहायला हवी. या राज्यातील प्रत्येक संस्था गुजरातच्या ताब्यात गेली तर महाराष्ट्राचं कसं होणार? असंही राऊत म्हणाले.
शिर्डी लोकसभा लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्यानं त्यामुळे मूळ शिवसेनेकडे ताकद आहे. ही ताकद काय आहे, जिंकण्याची क्षमता किती आहे हे सर्वांना माहिती असल्याचं संजय राऊत म्हणाले आहे.
नगरच्या जागेबद्दल अजून कुठलीही चर्चा नाही : अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेबद्दल अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र, माजी मंत्री शंकरराव गडाख हे नगर दक्षिण जागेसाठी प्रबळ आणि एक योग्य उमेदवार असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहे. खासदार संजय राऊत यांचा साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी तिलक बागवे यांनी शाल साईमूर्ती देऊन सन्मान केला.
हेही वाचा: