अहमदनगर: दिल्लीत गेल्याशिवाय पैसे कसे मिळणार? ज्या लोकांनी स्वतःचा प्रतिष्ठेसाठी दिल्लीशी सबंध तोडून ठेवले होते. त्या लोकांनी यापासून धडा घेतला पाहिजे, अशी खरमरीत टीका शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरेंचे नाव न घेता केली. केसरकर हे शिर्डीला आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. गेल्या एका वर्षात राज्याला कोट्यवधीचा निधी मिळला असून 2 लाख कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या योजना पंतप्रधानांनी राज्याला दिल्या आहेत. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांशी चांगले सबंधं ठेवले पाहिजे. सर्वांशी चांगले बोलले पाहिजे, यालाच खरे राजकारण म्हणतात. हेच बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होते, असेही दीपक केसरकर म्हणाले.
नातवाच्या अॅडमीशनसाठी साई चरणी: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे शिर्डीच्या साईबाबांचे साईभक्त आहेत. गेल्या काही वर्षापासून केसरकर साई दरबारी वारंवार हजेरी लावत आहेत. चार दिवसांपूर्वी सहकुटुंब येऊन साईचे दर्शन घेतल्यानंतर केसरकर शनिवारी पुन्हा साईबाबांच्या चरणी आले. माझ्या नातवाचे अॅडमीशन झाले त्याचे शैक्षणिक जीवन सुरू होत आहे. हे सांगण्यासाठी आपण साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालो,असल्याचे केसरकर म्हणाले.
नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळला असल्याने जावई आणि मुलगी आणि नातवाला घेऊन साईबाबांचा दर्शनासाठी आलो आहे.माझ्या नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवा म्हणून मी टेन्शनमध्ये होतो.माझ्या नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून मी सत्तेचा वापर केला नाही. त्याला उशिरा का होईना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला असल्याने आज मी त्यांना साईबाबांचा दर्शनासाठी घेऊन आलो. - दीपक केसरकर,शालेय शिक्षण मंत्री
खरे राजकारण: विरोधकांकडून फडणवीस-शिंदे हे सारखे दिल्लीला जातात,अशी टिका केली जाते. यावर उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रतिष्ठेमुळे दिल्लीशी संबध खराब करुन महाराष्ट्राचे एकप्रकारे नुकसान केले आहे. महाराष्ट्राचे गतवैभव आपल्याला पुन्हा प्राप्त मिळवायचे आहे. महाराष्ट्राला उंचीवर नेण्यासाठी सर्वांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे.महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीतरी मिळवले पाहिजे, त्यालाच खरे राजकारण म्हणतात. त्यालाच खरे समाजकारण म्हणतात. जे बाळासाहेबांना अपेक्षित होते, असे केसरकर म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हवा आहे, त्यासाठी दिल्लीला जावून आपला अधिकार मागावा लागतो.
आमदरांचे काय होणार : 16 आमदारांच्या बाबतच्या निर्णयाचा अधिकार पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहे. ते विचारपूर्वक हा निर्णय घेतील,याची मला खात्री असल्याचे केसरकर म्हणाले. मला अँक्टमधील जेवढे कळते त्यानुसार विधानसभेच्या फ्लोअरवर हा अँक्ट लागू होतो. एखाद्या वेळी तुम्ही बैठक बोलवली ती,ऐनवेळी बोलवलेली असते. अनेकवेळा लोकांना माहिती नसते, त्या बैठकीला नोटीस म्हणजे व्हिप आहे का नाही. ज्यावेळी व्हिप दिला जातो आणि मोडला जातो, त्याचवेळेला तो कायदा लागू होतो. त्यामुळे खोटे कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आमदारांना अपात्र केले की बहुमत दोन तृतीयांश राहणार नाही. यासाठी उचलेले हे एक हे पाऊल असल्याचे केसरकर म्हणाले.
अजित पवारांमुळे ताकद वाढली : अजित पवार यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही पुढच्या निवडणूकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे अनेक लोक हे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री पदाबाबतचे विधान अजित पवारांनी दिलेले नाही.अजित पवार आल्यामुळे आता आमची ताकद वाढली आहे. तिघे मिळून त्रिमूर्ती महाराष्ट्राचे कल्याण करेल. याआधीच्या सरकारमध्ये त्रिमूर्ती होती का यावर केसरकर म्हणाले की,ते स्वतःला कधीही त्रिमुर्ती म्हणवून घेत नव्हते. त्यांनी काँग्रेसबरोबर करार केला होता. आम्ही हिंदुत्वाचा उल्लेख कधीही करणार नाही. विशेष म्हणजे शेवटपर्यंत ते कधीही हिंदुत्वाचा उल्लेख करू शकले नाहीत. इंडिया म्हणजे हिन्दुस्थान नाही. ब्रिटिशांनी ज्यांची फाळणी केली ते इंडिया होते,असेही केसरकर म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी काय केले : मात्र महाराष्ट्र कुठे तरी मागे येतोय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली होती. त्यावर दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. आदित्य कधी पुढे असले तर ते मागे जातील ना,असा सवाल करत केसरकरांनी आदित्यांच्या कामचा जाब विचारला. अडीच वर्ष मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांनी काय केले. हे आधी लोकांना सांगायला पाहिजे. केवळ एनजीओना भेट देऊन आंतरराष्ट्रीय बक्षिसे मिळवणे म्हणजे राज्याचे कल्याण होत नाही. राज्याचे कल्याण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी शिकले पाहिजे. तसे त्यांच्याकडून घडावे, अशीच अपेक्षा करू शकतो,असा टोला दिपक केसरकरांनी यावेळी लगावला.
हेही वाचा -