ETV Bharat / state

अपहरण झालेले बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

सहा दिवसांपूर्वी अपहरण झालेले श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण (वय 49 ) यांचा मृतदेह राहाता तालुक्यातील वाकडी शिवारातील एमआयडीसीच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर आज सकाळी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांची हत्या तीन-चार दिवसांपूर्वीच झाली असावी, अशी शक्यता दिसत आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम पाहता गुन्हेगार स्थानिक असावेत, अशीही चर्चा आहे.

author img

By

Published : Mar 7, 2021, 1:42 PM IST

Ahmednagar Shrirampur Belapur Latest News
अहमदनगर शिर्डी व्यापारी गौतम हिरण हत्या न्यूज

अहमदनगर - सहा दिवसांपूर्वी अपहरण झालेले श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण (वय 49 ) यांचा मृतदेह राहाता तालुक्यातील वाकडी शिवारातील एमआयडीसीच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर आज सकाळी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे.

अपहरण आणि हत्येबाबत तर्क-वितर्क

या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हात एकच खळबळ उडाली असून त्यांची हत्या तीन-चार दिवसांपूर्वीच झाली असावी, अशी शक्यता दिसत आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम पाहता गुन्हेगार स्थानिक असावेत, अशीही चर्चा आहे. तसेच, त्यांचे सिनेस्टाईलने अपहरण आणि हत्या करण्यामागे नेमके काय कारण असावे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे घटनेच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगार शोधून काढणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बेलापूरचे ग्रामस्थ, तालुक्यासह जिल्ह्यातील व्यापारी यांनी तीव्र संताप व्यक्त करून गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - शिर्डीच्या स्वच्छतेसाठी भाविकांकडून कर वसुलीचा ठराव; शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध

गौतम हिरण गेल्या सोमवारपासून बेपत्ता

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण गेल्या सोमवारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी, त्यांचा शोध लागला नसल्याने बेलापूर ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी 6 मार्च रोजी गाव कडकडीत बंद ठेवत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. त्यात या घटनेबाबत अचूक माहिती देणाऱ्यास हिरण परिवार, व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने 5 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

विधानसभेत मुद्दा उपस्थित

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे 5 मार्च रोजी सायंकाळी आपल्या फौजफाट्यासह बेलापूर गावात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हिरण यांचे गोडाऊनला भेट दिली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील पाहणी केली. या घटनेतील साक्षीदारांशी देखील त्यांनी चर्चा केली. व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणाबाबतचा तपास सुरू असून तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.