अहमदनगर - शहर उपजिल्हा कारागृहातील आरोपीने बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचार्यावर चाकू हल्ला केला. कारागृहात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पावलस कचरू गायकवाड असे या हल्लेखोर आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी सुजाता निवृत्ती शेळके-हाडवळे (वय- 27) या जखमी झाल्या आहेत. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने आरोपीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा - शरद पोक्षेंनी केले हिंसेचे समर्थन; म्हणाले, 'अहिंसेच्या लसीमुळे आपण नपुंसक झालो'
सुजाता शेळके या कारागृहातील मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बंदोबस्तासाठी होत्या. त्यावेळी कैदी पावलस गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेऊन सुजाता यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकूने वार केला. मात्र, सुजाता यांनी तो वार डाव्या हातावर झेलल्याने त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.