ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात २८० रुग्णांची वाढ; एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५३७ वर - अहमदनगर कोरोना अपडेट

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४८० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी ७० जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या संख्येत ३४ रुग्णांची भर पडली.

Ahmednagar
अहमदनगर जिल्ह्यात २८० रुग्णांची वाढ; एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५३७ वर
author img

By

Published : Jul 26, 2020, 9:40 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत २८० रुग्णांची भर पडली. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०४, अँटीजेन चाचणीमध्ये १८ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ जण बाधित आढळून आले. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ५३७ इतकी झाली असून, एकूण रुग्ण संख्या ३ हजार ६८ इतकी झाली आहे. ४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४८० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी ७० जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या संख्येत ३४ रुग्णांची भर पडली. यामध्ये अकोले ०४, पाथर्डी ०२, नेवासा ०१, नगर ग्रामीण ०४, मिलिटरी हॉस्पिटल २, कर्जत ०१, श्रीरामपूर ११, कोपरगाव ०३, मनपा ०३, श्रीगोंदा ०२, संगमनेर येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत १८ जण कोरोनाबाधित आढळले. त्यात, राहाता ०२, पाथर्डी ११, कोपरगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि मनपायेथील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या १५८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १०४, अकोले ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण १६, नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी ०२, राहाता १४, राहुरी ०३, संगमनेर ०३, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सद्यस्थिती -

उपचार सुरू असलेले रुग्ण: १५३७

बरे झालेले रुग्ण: १४८०

मृत्यू: ५१

एकूण रुग्ण संख्या:३०६८

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.