शिर्डी (अहमदनगर) - कोरोना महामारीच्या (#CORONAIMPACT) पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक बालक निराधार झाले. राहाता तालुक्यातील जवळपास पन्नास गावात केलेल्या सर्वेत या आजारामुळे 255 कुटूंब पोरके झाले आहे. कोरोना हा केवळ आजार नव्हेतर अनेक कुटूंबाच्या समोर विविध प्रश्न उभे करणारा असा काळच ठरला आहे. तरुण वयात अकाली वैधव्य आलेल्या महिलांच्या पुढे या पुढील जीवनात वाटचाल करावी तरी कशी? असा प्रश्न उभा ठाकला आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने 318 अंगणवाडी सेविकाची मदत घेऊन सर्वे करण्यात आला आहे. यात एकट्या राहाता तालुक्यात 255 महिलांना कोरोनामुळे आपल्या पतींना गमवावे लागले आहे.
...अन् ते बेघर झाले
राहाता तालुक्यात पाच बालकांना आई आणि वडील या दोघांचेही छत्र आता राहिले नाही. शिर्डी जवळील रुई येथे साईश्वरी आणि साई हे अवघ्या तेरा वर्षाची भावंडे राहत असुन दोघेही लहान असतांनाच वडील गेले. आईने पार्लरचा कोर्स करत गावातच एक छोटासा पार्लर सुरू करून त्यांचे संगोपन करण्यास सुरूवात केली. मात्र दुसऱ्या लाटेत सरला गिधाडलाही कोरोनाने गाठले. तब्बल पचंवीस दिवसाच्या कोरोना बरोबरच्या लढाईने ती दोन महिण्यापुर्वी हारली आणि या चिमुकल्याना सोडून गेली. रुई गावातीलच एका छोट्याशा घरात ही मुलं आज त्यांचे काका श्रीरामुपरला अँटो रिक्षा चालवतात. त्यांनाही तीन मुलीचं आहे. त्यामुळे साईईश्वरी आणि साईची काळजी सध्या शेजारीलच एक मुस्लीम कुटुंबिय घेत आहे. ही मुले त्याच्या मुला बरोबर राहत आहे. मात्र आजही घराच्या पडवीत बसुन आपल्या आईच्या आठवणीने तासन तास रडत असतात.
'ती' पोरकी झाली
तर दुसरीकडे शिर्डी जवळच्या पिपळस येथील स्वाती म्हात्रे ही एक विवाहित शालेय शिक्षण घेतानांच तीला पोलीस खात्यात जायच होत. मात्र लहानपणीच वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची फरफट सुरू झाली. आईने नौकरी करत तिच लग्न लावून दिले. मात्र तिला संसारात
सुख मिळाले नाही. तिचे पती प्रशांतला आई वडील सहकार्य करत नव्हते. त्यामुळे विभक्त होवुन त्यांनी शहरात बिऱ्हाड मांडले. अखेर शिर्डी जवळ स्थायिक होवुन गाडी चालक म्हणून दोन पैसे मिळविण्यास सुरूवात केली. स्वाती आणि प्रशांत यांना तब्बल आठ वर्षानंतर एक गोंडस मुलगी झाली. काहीसा संसार स्थिर स्थावर होत असतांनाच कोरोना साथ आली आणि शिर्डीतही लॉकडाऊन झाले. गाडी धंदा बंद होऊन उपासमारी सुरू झाली. अखेर सप्टेंबरमध्ये स्वातीच्या पतीने काळजी घेत गाडी भाडेसाठी सुरूवात केली. मुंबईला एका कोरोनाबाधित रुग्णाला सोडल्यानंतर प्रशांतलाही कोरोनाने गाठले. काही उपचार करुन तो पुन्हा काम करु लागला. मात्र कोरोनाने त्याला ग्रासले. यातच प्रशांतचा निधन झाला. इकडे स्वातीवर आभाळ कोसळले.
अशी आहे सर्वेक्षणातील आकडेवारी
अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदा राहाता तालुक्यात अशाप्रकारचे सर्वे करणारा तालुका पहिला तालुका ठरला. ज्या पद्धतीने किती बालके निराधार झाली, याची माहिती घेतली जात असताना कोणत्या वयोगटातील कोणत्या महिला यांना अकाली वैधव्य आले आहे. याकडे देखील लक्ष देण्यात आले होते. 18 ते 30 वयोगटातील 17 महिला असून, 31 ते 40 वयोगटातील 48 महिला, 41 ते 50 वयोगटातील 43 तर 51 ते 70 या वयोगटातील 114 महिलाचा व 70 ते 90 यातील 32 महिलांचा जोडीदार या आजाराने हिरावून नेले आहे. त्या अनुषंगाने राहाता तहसील कार्यालयाने 60 महिलांना संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजना यांचा लाभ दिला. 29 महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 20 हजाराची मदत दिली जाईल, अशी माहिती गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी 'ईटीव्ही भारतशी' बोलतांना दिली आहे. कोरोना संकटात महिला असो की पुरुष शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत, त्याचा लाभ देण्यासाठी तहसील कार्यालयाने प्राधान्यक्रम दिले आहे. ज्यांना या आजाराचा फटका बसला आहे, त्यांनी योग्य त्या कागदपत्रासह राहाता तहसीलकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.