ETV Bharat / state

सहकार मंत्रालयाची स्थापना करून राज्यातील सहकारी चळवळीवर नियंत्रण?

author img

By

Published : Jul 9, 2021, 4:28 PM IST

Updated : Jul 9, 2021, 5:49 PM IST

सहकार चळवळीचा प्रभाव महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यात आहे. त्यामुळे या चळवळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल. त्यासाठीच मंत्रालय स्थापन करण्यात आले, अशी शंका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शिर्डी - सहकार मंत्रालयाची स्थापना करून केंद्र सरकार राज्यातील सहकारी चळवळीवर नियंत्रण आणेल, अशी शंका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना सतावत आहे. तर भाजपवासी झालेल्या साखर सम्राटांच्या वर्तुळात मात्र या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

सहकार चळवळीचा प्रभाव महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यात आहे. त्यामुळे या चळवळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल. त्यासाठीच मंत्रालय स्थापन करण्यात आले, अशी शंका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. महाराष्ट्रात सहकारी चळवळीवर म्हणजे सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, सुतगीरण्या, पतसंस्था, बाजार समित्या यावर राष्ट्रवादी व काही प्रमाणात काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यास धक्का दिला जाऊ शकतो असे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटाला वाटत आहे.

स्वातंत्र्यापासून कृषी खात्याशी जोडला गेलेला सहकार हा विषय वेगळा काढून, त्याचं वेगळं मंत्रालय आणि त्यासाठीचे नवीन नियम केंद्र सरकारने तयार केले आहेत. या नव्या मंत्रालयाची धुरा दस्तुरखुद्द अमित शहांकडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर लगेच चर्चांनाही सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या भरभराटीत सहकाराचा मोठा वाटा राहिला आहे. ग्रामीण भागात रोजगार, शिक्षण, पतपुरवठा, वैद्यकीय सेवा अशा अनेक जबाबदाऱ्या सहकारी संस्थांनी उचलल्याने या राज्यांनी प्रगतीचा मोठा टप्पा ओलांडला आहे. पण, गेल्या काही काळात हीच सहकारी चळवळ मोडीत काढून त्या संस्थांवर खासगीकरणाच्या माध्यमातून ताबा मिळवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे जिथं सहकाराची गंगा पहिल्या प्रथम अवतरली त्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा खासगी साखर कारखान्यांची संख्या जास्त झाली आहे.

राज्यात पूर्वी पाच खासगी तर दिडशेहून अधिक सहकारी साखर कारखाने होते. मात्र, सहकारातील नेत्यांनीच हे कारखाने मोडीत काढून खासगी कारखाने सुरू करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे आता राज्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांची संख्या समसमान ९५ एवढी झाली आहे. अपवाद वगळता बऱयाच सहकारी बँका अडचणीत सापडलेल्या आहेत, तर काही बंद आहेत. सहकारी दुधसंघाचा एकूण दुधपुरवठ्यातील वाटा अवघा पंचवीस टक्के राहीला आहे. गोकूळ व काही प्रमाणात राजहंस असे ब्रॅण्ड वगळता सहकार क्षेत्राचे दूध उत्पादनातील वाटा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे या चळवळीवर केंद्राचे नियंत्रण आवश्यक असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला. आज जिल्ह्यात जवळपास 20 सहकारी साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यावर सध्या जिल्हातील पक्षीय बलाबल आणि त्यांच्या ताब्यातील सहकारी संस्था बघितल्या तर, उत्तर अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या ताब्यात 4 तर राष्ट्रवादीच्या ताब्यात 3, कॉग्रेसच्या 1 आणि शिवसेनेच्या 1 कारखाने आहेत. तर जिल्ह्यात सर्वात मोठा राजहंस हा दूध संघ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्याही त्यात्या आमदारांच्या ताब्यात आहेत.

जिल्ह्यातील आमदारांचं पक्षीय बलाबल -

काँग्रेस -

1 ) बाळासाहेब थोरात - संगमनेर

2 ) लहु कानडे - श्रीरामपूर

राष्ट्रवादी काँग्रेस -

1 ) आशुतोष काळे - कोपरगाव

2 ) निलेश लंके - पारनेर

3 ) संग्राम जगताप - अहमदनगर

4 ) रोहित पवार - कर्जत जामखेड

5 ) किरण लहामटे - अकोले

6 ) प्राजक्ता तनपुरे - राहुरी

भाजप -

1 ) राधाकृष्ण विखे पाटील - शिर्डी

2 ) मोनिका राजळे - पाथर्डी

3 ) बबनराव पाचपुते - श्रीगोंदा

शिवसेना -

1 ) शंकरराव गडाख - अपक्ष नंतर शिवसेनेत प्रवेश

जिल्हातील उत्तरेतील साखर कारखान्यांच्या बाबतीत बोलायच झालं तर....

कोपरगाव तालुका -

कोपरगाव तालुक्यात 2 साखर कारखाने आहेत. त्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे वर्चस्व आहे. तर कर्मवीर शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे वर्चस्व आहे. तर स्थानिक सहकारी संस्थांवर निमेनिमे वर्चस्व आहेत.

राहाता तालुका -

राहाता तालुक्यात गणेश सहकारी साखर कारखाना आणि प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सहकारी साखर कारखाने भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदिपत्याखाली सुरू आहेत. राहाता तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थेवर विखे पाटलांचा वर्चस्व आहे.

संगमनेर तालुका -

संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना. त्याचबरोबर राजहंस दुध सहकारी संघ हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदिपत्याखाली सुरू आहेत. त्याचबरोबर छोट्या मोठ्या सर्वच सहकारी संस्था थोरात यांच्या आधिपत्याखाली आहे.

अकोले तालुका -

अकोले येथील अगस्ति सहकारी साखर कारखान्यावर पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले मधुकर पिचड यांची सत्ता आहे.

श्रीरामपूर तालुका -

श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्यावर अपक्ष नेते भानदास मुरकुटे यांचे वर्चस्व आहे.

नेवासा तालुका -

नेवासा तालुक्यात 2 सहकारी साखर कारखाने आहेत. त्यातील लोकनेते मारुतीरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पक्षाचे घुले कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. तर दुसऱ्या मुळा सहकारी साखर कारखान्यावर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला आणि सध्या मंत्री असलेले शंकरराव गडाख यांचे वर्चस्व आहे.

राहुरी तालुका -

राहुरी तालुक्यात डॉ. बाबा तनपुरे सहकारी साखर कारखाना आहे. यावर राष्ट्रवादीचे तनपुरे कुटुंबीयांचे वर्चस्व होते. मात्र, हा साखर कारखाना अडचणीत असून सध्या भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या आदिपत्याखाली सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सहकार क्षेत्राला सध्या फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत असून, या क्षेत्रालाही व्यवसाय सुलभता मिळण्याची गरज आहे. यावर मोदी सरकारने भर दिला हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला केंद्र सरकारच्या धोरणांचे आणि कायद्यांचे पाठबळ मिळेल. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक शिस्त निर्माण करण्यास आणि सध्याच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल. सहकार क्षेत्रावर अवलंबून असलेल्या असंख्य सामान्य शेतकरी आणि ठेवीदारांच्या हिताचे मोदी सरकारच्या निर्णयामुळे रक्षण होईल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने काल सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि आज त्यावर लगेचच प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल. तथापि जाणकारांच्या मते या माध्यमातून राज्यातील सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार तसेच कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सांगितले.

पंजाब आणि हरियाणात बाजार समित्यांचे जाळे पक्के आहे. त्याद्वारे हमीभाव देऊन केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर गहू खरेदी करते. नव्या कृषी कायद्यांमुळे या व्यवस्थेला धक्का लागेल, अशी भिती तेथील शेतकऱयांना वाटू लागली. त्यातून आंदोलनकर्ते शेतकरी दिल्ली भोवतालच्या प्रमुख रस्त्यांवर ठिय्या देऊन बसले आहेत.

सहकार चळवळीचा प्रभाव महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यात आहे. त्यामुळे या चळवळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल. नवीन कृषी कायद्याच्या दृष्टीने राज्यातील बाजार समित्यांवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार नवीन सहकार मंत्रालयामार्फत केला जाऊ शकेल असे दिसत आहे. बाजार समित्या नियंत्रणात येऊ शकते. महाराष्ट्रात सहकारी चळवळीवर म्हणजे सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, सुतगीरण्या, पतसंस्था, बाजार समित्या यावर राष्ट्रवादी व काही प्रमाणात काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामुळे या संस्थांवर गदा येऊ शकते का? या बाबत सध्या तरी तर्कवितर्कच लाऊ शकतो, असे ज्येष्ठ पत्रकार आणि सहकार क्षेत्राचे अभ्यासक सतिष वैजापुरकर म्हणाले.

Last Updated : Jul 9, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.