शिर्डी (अहमदनगर) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत आजपासून ( दि. 31 मे ) सुरू होत आहे. 1 व 2 जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्याबाबत रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणीसंदर्भात रोडमॅप तयार करतील आणि त्यावर समूह चर्चा होईल तर दुसऱ्या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यशाळेला पक्ष प्रभारी एच. के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित असतील, असे थोरात यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न समजून मार्ग काढणार - राज्यातील प्रश्नावर बोलतांना थोरात यांनी राज्यात किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलेले आहोत. यात पहीली गोष्ट शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होती पहिल्याच अधिवेशनात ती दिलीही गेली. नियमीत कर्जफेड करणार्यांनाही पन्नास हजारांची मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांना भेटण्यात मला काही अडचण नाही. शेतकऱ्यांना नेहमीच काहींना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील पाहीजे यात माझ्या मनात शंका नाही. त्यांचे प्रश्न समजून घेवून मार्ग काढणार असल्याचे यावेळी बाबासाहेब थोरात म्हणाले आहे.
काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात - काँग्रेस हा देशपातळीवरचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाबाबत होत असलेल्या निर्णय हे दिल्लीत होत असतात. दिल्लीला जावून पक्षक्षेष्टींशी आम्ही चर्चा करत असतो. पक्षाच्या बैठका दोन तीन महीन्यांनी होत असतात. मात्र, शिर्डीतील अधिवेशन होणार आणि त्याचा सबंध पक्षातील नाराजीबाबत काही बातम्या आल्या त्याचा उगम कुठुन झाला याचा शोध घ्यावा लागेल. आमच सरकार तीन पक्षाच सरकार आहे. काही अडचणी आहेत. तिन्ही पक्षात समन्वय करावा लागतो. आमचे काही प्रश्न आहेत आम्ही नाकारत नाही एका पक्षाचे सरकार असले तर त्यांच्यात प्रश्न असतात. गेली अडीच वर्षे आमच्या सरकारने चांगल काम केले आहे. तीन पक्षाच सरकार असल्याने त्यांची चर्चा आम्ही हाय कमांडशी करू. मात्र, काँग्रेस पक्षात नाराजी नसल्याच थोरात यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - बहुजनांचे लचके तोडायचा डाव, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर पडळकर कडाडले