ETV Bharat / state

Balasaheb Thorat Criticized BJP Ministers: देशात जातीय भांडणे लावून पुढच्या वेळेस सत्तेत येण्याचा प्रयत्न-बाळासाहेब थोरात - Congress leader Balasaheb Thorat

राज्यात अनेक ठिकाणी दंगली होत आहेत. त्यांच्याकडे एकच उपाय शिल्लक राहीला की, भांडण लावा आणि दंगली घडवा. आपोआप मते मिळतील आणि आपण पुन्हा सत्तेवर जावु. एवढाच उपाय त्यांच्याकडे शिल्लक राहीला असल्याचा आरोप भाजप सेना सरकारवर राज्याचे माजी महसुल मंत्री कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये केला आहे. देशात जातीय भांडणे लावून पुढच्या वेळेस सत्तेत यावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat criticized BJP Ministers
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jun 8, 2023, 2:20 PM IST

Updated : Jun 8, 2023, 2:28 PM IST

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाषण

अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडविल्या जात आहेत. संगमनेरमध्ये आम्ही शांततेने राहतो. मात्र, त्यांना निवडणूक जिंकता येत नाही. म्हणुन जाती पातीचे राजकारण करुन संगमनेर मोडेल, कसे पेटले, दंगली कश्या होतील? असा प्रयत्न केला जात असल्याची गंभीर टिका विखेंचे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते निळवंडे धरणाच्या कालव्यातुन सोडण्यात आलेल्या पाण्याचे जलपुजन कार्यक्रमातील भाषणात बोलत होते.

संगमनेर जाळण्याचा प्रयत्न : निळवंडे धरणातुन अनेक वर्षानंतर पाणी सोडण्यात आले. लोक आनंद उत्सव साजरा करत असताना संगमनेर शहरात दंगली कश्या होतील, हा प्रयत्न सुरु होता. भगव्या मोर्चा प्रसंगीही काही लोकांना दंगली घडविण्यासाठी सोडण्यात आले होते. निवडणूक जिंकता येत नाही, तर दंगली घडवुन आणत संगमनेर जाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांचे नाव न घेता केला आहे.

शरद पवार यांचा सल्ला योग्य : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा महाविकास आघाडीच्या येतील, असे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. कर्नाटकच्या विजयानंतर मोठा उठाव सोशल मीडीयावर होत आहे. संगमनेर तालुका अशांत कसा होईल? याकडे काही लोक लक्ष देत असल्याचे थोरात यांनी सांगितले. शरद पवार यांचा सल्ला योग्य असल्याचेही थोरातांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या चाचणीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. हे पाणी संगमनेरातील दुष्काळी भागात पोचल्यावर तळेगाव दिघे गटातील लोकांनी एकच जल्लोष केला. या लोकांच्या आनंदात संगमनेर तालुक्याचे आमदार व कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Balasaheb Thorat on Loksabha Election : महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू-बाळासाहेब थोरात
  2. काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील पाळणा दुर्घटनेतील जखमी कुटुंबीयांची घेतली भेट
  3. Thorat on Pawar : शरद पवार यांना बाजूला जाऊन चालणार नाही - थोरात

Last Updated : Jun 8, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.