ETV Bharat / state

यूपीचे क्रीडामंत्री चेतन चौहान साईचरणी लीन; भारत विश्वकंरडक जिंकणारच, व्यक्त केला विश्वास

भारत - पाकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना सैन्यास खेळात आणणे चुकीचे आहे. कोणताही विवाद न वाढवता त्यांना खेळू द्या आणि भारत जिंकण्यासाठी प्रार्थना करा, अस आवाहन चेतन चौहान यांनी केला आहे.

author img

By

Published : Jun 8, 2019, 7:37 PM IST

चेतन चौहानने घेतले साईंचे दर्शन

अहमदनगर - उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी आज शिर्डीत येऊन साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकंरडकातील भारताच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या क्रीडा धोरणाबाबत माध्यमांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या.

यूपीचे क्रीडामंत्री चेतन चौहान साईचरणी लीन

सध्या सुरू असलेल्या विश्वकंरडकात भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. भारत यंदा विश्वकरंडक नक्कीच जिंकेल, असा विश्वास क्रीडामंत्री चेतन चौहान यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम आता पूर्वीएवढी दमदार नसून ती उपांत्यफेरीपर्यंतही पोहचू शकणार नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महेंद्रसिंह धोनी याच्या ग्लोजवरील स्टिकरवरून निर्माण झालेल्या वादाविषयी बोलताना चौहान यांनी असे स्टिकर वापरण्यावर आक्षेप घेतला. कोणत्याही स्पर्धा अटी-शर्तीने होतात, प्रत्येक क्रिकेट बोर्डाचा खेळाडुंशी करार असतो. एकाने स्टिकर लावला तर इतर खेळाडूही त्याचे अनुकरण करतील आणि हे प्रकार वाढत जातील. भारत - पाकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना सैन्यास खेळात आणणे चुकीचे आहे. कोणताही विवाद न वाढवता त्यांना खेळू द्या आणि भारत जिंकण्यासाठी प्रार्थना करा, अस आवाहन चेतन चौहान यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील खेळाडूंना सरकार चांगल प्रोत्साहन देत आहे. ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱयास ६ कोटी , रजत पदक जिंकणाऱयास ४ कोटींचे बक्षीस तर कास्य पदक विजेत्याला २ कोटीचे बक्षीस देण्यात येणार आहे. ऑलिंम्पिकमध्ये केवळ सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनाही १० लाखाचे बक्षीस सरकारकडून देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंना दरमहा २० हजार रुपये पेन्शन सुरू केल्याचे चौहान म्हणाले. तसेच सरकारी नोकरीतही उत्तर प्रदेशात खेळाडूंना दोन टक्के आरक्षण दिल्याची माहिती चौहान यांनी दिली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_उत्तर प्रदेशचे क्रिडामंत्री आणि माजी क्रिकेट पट्टू चेतन चौहाण यांनी आज शिर्डीत येवुन साई समाधीच दर्शन घेतलय त्या नंतर सध्या सुरु असलेल्या वल्डकप मधील भारताच्या कामगीरी बाबत आणि उत्तर प्रदेश सरकारच्या क्रिडा धोरणा बाबत माध्यमांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या....

VO_ सध्या भारतीय संघाची कामगीरी चांगली असुन वर्ल्ड कप आपला संघ जिंकण्याचा विश्वास क्रिडामंत्री चौहान यांनी व्यक्त केलाय. ऑस्ट्रेलीयाची टिम आता तेव्हढी दमदार नसुन ते सेमी फायनल पर्य़त ही पोहचु शकनार नसल्याचा विश्वास चौहान यांनी व्यक्त केलाय....

BITE_चेतन चौहाण क्रिडामंत्री उत्तर प्रदेश

VO_महेंद्र सिंग धोनी याच्या ग्लोजवरील स्टिकरवरून निर्माण झालेल्या वादाविषयी बोलताना चौहान यांनी असे स्टिकर वापरण्यावर आक्षेप घेतला...कोणत्याही स्पर्धा अटी शर्तीने होतात , प्रत्येक क्रिकेट बोर्ड खेळाडुंशी करार करत असत.एकाने स्टिकर लावल तर इतर खेळाडुही त्याच अनुकरण करतील आणि हे प्रकार वाढत जातील..भारत - पाक मधे तणावजन्य परिस्थीती असताना सैन्यास खेळात आणने चुकीचे आहे.कोणताही विवाद न वाढवता त्यांना खेळु द्या आणि भारत जिंकण्यासाठी प्रार्थना करा अस आवाहन चेतन चौहाण यांनी केलय.....

BITE_चेतन चौहाण क्रिडामंत्री उत्तर प्रदेश

VO_उत्तर प्रदेशातील खेळाडूंना सरकार चांगल प्रोत्साहन देतय ऑलिंपिकमध्ये गोल्डमेडल जिंकणा-यास 6 कोटी , सिल्वर मेडल जिंकणा-यास 4 कोटींच बक्षीस देण्यात येतय तर ब्रान्झ पदक विजेत्याला 2 कोटीचे बक्षीस देण्यात येणार असून ऑलिंपिकमध्ये केवळ सहभाग घेणा-या खेळाडूंनाही दहा लाखाचे बक्षीस सरकार कडुन देण्यात येणार असून उत्तर प्रदेशातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंना दरमहा 20 हजार रूपये पेन्शन सुरू केल असल्याच चौहाण यांनी म्हटलय....तसेच सरकारी नोकरीतही उत्तर प्रदेशात खेळाडूंना दोन टक्के आरक्षण दिल्याची माहीती उत्तर प्रदेशचे क्रिडामंत्री चैतन चौहाण यांनी आज शिर्डीत माहीती दिलये.....

Body:MH_AHM_Shirdi Chaitan Chauhan_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Chaitan Chauhan_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.