ETV Bharat / state

कोविड रुग्णालयांकरिता 'सेन्ट्रल ऑक्सिजन टँक' उभारणारे प्रवरा मेडिकल एकमेव - डाॅ.राजेंद्र विखे-पाटील

प्रवरा मेडिकल विश्वस्त संस्थेने कोविड रुग्णालयात सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक ही आधुनिक यंत्रणा बसवली आहे. या सुविधेचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी डाॅ.राजेंद्र विखे पाटील बोलत होते.

author img

By

Published : Sep 30, 2020, 7:27 PM IST

शिर्डी
शिर्डी

शिर्डी (अहमदनगर) - राज्यासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना नगर जिल्ह्यात केवळ कोविड रुग्णालयांकरिता 'सेन्ट्रल ऑक्सिजन टँक' उभारणारे प्रवरा मेडिकल विश्वस्त संस्थेचे (ट्रस्ट) एकमेव रुग्णालय असल्याची माहिती डाॅ. राजेंद्र विखे-पाटील यांनी दिली. प्रवरा मेडिकल विश्वस्त संस्थेने कोविड रुग्णालयात सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक ही आधुनिक यंत्रणा बसवली आहे. या सुविधेचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा सुरू करावा; शिर्डीतील ग्रामस्थांची मागणी

कोरोना चाचणी, कोविड रुग्णालय, कोरोना संदर्भात जनजागृती, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग अशा प्रकारच्या सेवा नगर जिल्ह्यात या संकट काळात देण्यात प्रवरा मेडिकल विश्वस्त संस्था अग्रेसर राहिली. अशात गेली काही महिने राज्यात वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहता सगळीकडे ॲाक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, या काळातही काही स्थानिक संस्थांच्या मदतीने कोविड रुग्णालयात ॲाक्सिजन पुरवठा संस्थेकडून सुरळीत ठेवला होता. मात्र, भविष्यातील गरज ओळखून सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक आम्ही नव्याने याठिकाणी बसवले असल्याचे विखे-पाटील म्हणाले आहे. आता एक महिना पुरेल इतका ॲाक्सिजन या व्यवस्थेमुळे रुग्णालयात देता येणार आहे. या यंत्रणेमुळे वेळ, पैसे आणि ॲाक्सिजनची उपलब्धता यात मोठी बचत होणार आहे. कोविड रुग्णांकरिता अधिकच्या सेवा देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी पुढे बोलताना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.