ETV Bharat / state

मंत्रिमंडळात अहमदनगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाखांना लॉटरी?

मंत्रिमंडळ विस्तारात अहमदनगर जिल्ह्यातील दोन आमदारांना लॉटरी लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि नेवासा येथील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांची नावे निश्चित झाली आहेत.

ahmednagar politics
तनपुरे, गडाख
author img

By

Published : Dec 30, 2019, 9:44 AM IST

अहमदनगर - आज (सोमवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अहमदनगर जिल्ह्यातील दोन आमदारांना लॉटरी लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि नेवासा येथील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांची नावे निश्चित झाली आहेत. तसेच या दोघांना याची कल्पना फोनवरून दिल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. तनपुरे हे राष्ट्रवादीच्या, तर गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असतील.

हेही वाचा - महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ

सत्तानाट्य सुरू असताना गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. तसेच ते बाळासाहेब थोरातांच्या नात्यातील असल्याने त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळत आहे. ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे ते पुत्र आहेत. नेवासा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उच्च विद्याविभूषित असलेले शंकरराव गडाख यांचे शरद पवारांशी निकटचे संबंध आहेत.

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, तनपुरे हे आज मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत.

हेही वाचा - आज मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या 'या' पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

प्राजक्त तनपुरे हे नगराध्यक्ष होते. तसेच ते जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहेत. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 25 वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तर आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. प्राजक्त हे उच्च विद्याविभूषित असून ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. ही पदवी त्यांनी पुणे येथून मिळवली असून एमई ही पदव्युत्तर पदवी अमेरिकेमधून घेतली आहे.

तनपुरे आणि गडाख यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याने राहुरी-नेवासा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. समर्थक नेटकऱ्यांनी अनेक ग्रुपवर नामदार तनपुरे, नामदार गडाख अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या आहेत.

Intro:अहमदनगर- मंत्रीमंडळात अहमदनगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख यांची वर्णी !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_gadakh_tanpure_mini_image_7204297

अहमदनगर- मंत्रीमंडळात अहमदनगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख यांची वर्णी !!

अहमदनगर- आज (सोमवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अहमदनगर जिल्ह्यातील दोन आमदारांची लॉटरी लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यात राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि नेवाशाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांची नावे निश्चित झाली असून या दोघांना तसे दूरध्वनी वरून तसे कळवल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तनपुरे हे राष्ट्रवादीच्या तर गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातुन मंत्री असतील.
गडाख यांनी सत्तानाट्यसुरु असताना शिवसेनेला पाठिंबा दिल्याने तसेच ते बाळासाहेब थोरातांच्या नात्यातील असल्याने त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळत आहेत. जेष्ठ नेते मा. खासदार आणि साहित्यिक शंकरराव गडाख यांचे ते पुत्र आहेत. नेवासा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. उच्चविद्याविभूषित असलेले शंकरराव गडाख यांचे शरद पवारांशी निकटचे संबंध आहेत.

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार तनपुरे हे आज मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत.
प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्ष असून जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहेत. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे पंचवीस वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तर आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. प्राजक्त हे उच्चविद्याविभूषित असून ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेत. ही पदवी त्यांनी पुणे येथून मिळवली. एम ई ही पदव्युत्तर पदवी अमेरिकेमधून त्यांनी घेतली आहे.
तनपुरे आणि गडाख यांची मंत्रिमंडळातील वर्णी लागणार असल्याने राहुरी-नेवासा मतदारसंघात कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. समर्थक नेटकर्यांनी अनेक ग्रुपवरून नामदार तनपुरे, नामदार गडाख अशा आशयाच्या पोस्ट सुरू केल्या आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- मंत्रीमंडळात अहमदनगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख यांची वर्णी !!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.