ETV Bharat / state

'कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी कंगनाच्या निमित्ताने अस्मितेचा प्रश्न सरकार उपस्थित करतंय' - भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील

नगर जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असताना त्यांनी एकही कोविड केंद्र सुरू केले नाही. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ हे कोल्हापुरात त्यांच्या मतरदारसंघात लॉकडाऊन करतात. मात्र, नगर जिल्ह्यातील खासदारांच्या लॉकडाऊनच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात. हा विरोधाभास विखे यांनी यावेळी बोलून दाखवला.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Sep 5, 2020, 10:18 PM IST

अहमदनगर - राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मूळ प्रश्न सोडून कंगणाच्या निमित्ताने अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे केला.

अहमदनगर

भाजपच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केंद्राचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना आणि कंगणाच्या निमित्ताने उपस्थित प्रश्नांवर बोलताना राज्य सरकरला धारेवर धरले. आज नगर जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असताना त्यांनी एकही कोविड केंद्र सुरू केले नाही. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ हे कोल्हापुरात त्यांच्या मतरदारसंघात लॉकडाऊन करतात. मात्र, नगर जिल्ह्यातील खासदारांच्या लॉकडाऊनच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात. हा विरोधाभास विखे यांनी यावेळी बोलून दाखवला.

राज्यातील जम्बो कोविड केंद्र हा केवळ दिखावा आहे, हे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने पुढे आल्याचेही विखे यांनी निदर्शनात आणले.

हेही वाचा - कोंबडीचोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह; अन् पोलीस ठाणे झाले क्वारन्टाईन

हेही वाचा - लॉकडाऊनच्या काळात नाभिक व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याचा आकडा धक्कादायक..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.