ETV Bharat / state

विखे पाटील शिवसेनेच्या वाटेवर? मंत्री अब्दुल सत्तारांसोबत स्नेहभोजनासह खलबते

अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंचावर आल्याचे लोणी येथे पाहायला मिळाले. राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावे, अशी ऑफर विखे पाटलांना मंत्री सत्तारांनी दिली आहे.

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार
शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Nov 22, 2020, 10:41 PM IST

Updated : Nov 22, 2020, 10:50 PM IST

शिर्डी - शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रविवारी बराच वेळ राजकीय खलबते झाली. श्रीरामपूर येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या उदघाटनाचे निमित्त दोघे एकाच व्यासपीठावर होते. या दोन नेत्यांत काय चर्चा झाली असेल या बद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच आब्दुल सत्तारांनी मी राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. मात्र, या बाबत अंतीम निर्णय पक्षप्रमु़ख उद्धव ठाकरेच घेतील, असेही सत्तार म्हणाले आहे. आता विखे पाटील पुन्हा शिवसेनेत जातील का यावर राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत.

विखे पाटील शिवसेनेच्या वाटेवर

सत्तारांची आणि माझी जुनी मैत्री, राजकीय अर्थ काढू नका-

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार आणि विखे हे दोघेही काॅंग्रेसमध्ये होते. सत्तार आणि विखे पाटलांची चांगली मैत्रीही आहे. निवडणुकीनंतर दोघांनीही दोन वेगवेगळ्या पक्षात पक्षांतर केले होते. या दरम्यानही विखे आणि सत्तार यांच्या गाठी भेटी झाल्या होत्या. रविवारी ग्रामविकास खात्याच्या आयोजित कार्यक्रम असल्याने विखे यांनी मंत्री सत्तारांना आमंत्रण दिल होते. त्यांची आणि माझी जुनी मैत्री आहे. यातून काही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असे विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे.

विखे पाटलांचा काँग्रेस,शिवसेना आणि आता भाजपा असा प्रवास राहिला आहे. विखे हे सत्तेशिवाय राहु शकत नाहीत, असे बोलले जात आहे. त्यात राज्यात लवकरच भाजपाची सत्ता येईल, असेही विखे पाटील एककीडे सांगताहेत. मात्र विखे भाजपातच राहतात की पुन्हा शिवसेनेची वाट धरतात, हे येणारा काळातच स्पष्ट होईल.

विखेंच्या घरी सत्तारांचे स्नेहभोजन-

राज्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेवर भाजप नेते सडेतोडपणे टीका करत आहेत. तसेच`लवकरच सत्तेत येणार, असेही ठामपणे सांगत आहेत. अशातच लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी शिवसेनेेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज स्नेहभोजन घेतले. त्यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. या चर्चेत काय शिजले, हे मात्र गुलदस्त्यात राहिले.

Last Updated : Nov 22, 2020, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.