अहमदनगर - शिर्डीत जेवढे साईभक्त येतात, त्यामध्ये एक चतुर्थांश देशभरातील चोरही असतात. म्हणूनच, चोरी हा प्रकार शिर्डीत रोजचाच झाला आहे. झटपट मिळणारा पैसा बघता, शिर्डीत चोरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यातील काही चोरांनी शिर्डी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-मनमाड महामार्गवरील 'बी. एम. बिअर & वाईन शॉपी' चे मध्यरात्रीच्या सुमारास कुलुप तोडून साठ हजार रुपयांची रोख रक्कम आणि वीस बिअरच्या बाटल्या चोरट्यानी लंपास केल्या.
बिअर शॉपीच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, कॅमेऱ्यांचे डीवीआर मशीनदेखील चोरट्यांनी पळवून नेले आहे. आज सकाळी ही बाब दुकानाचे मालक संदीप पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.