शिर्डी (अहमदनगर) - पिढ्यानं पिढ्यांपासून दुसऱ्याच्या शेतात खूरपण्याचे काम करत आपला प्रपंच चालणाऱ्या संगमनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील महिला आता त्यांच्या हाताने गणेशमूर्ती घडवत आहेत. कोरोनाच्या काळात अनेक छोटे मोठे उद्योगधंदे अडचणीत आल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले. मात्र आज याच कोरोनाने ज्या आदिवासी महिलेनेच्या हातात कायम खूरप घेऊन दुसऱ्याचा शेतीत काम कारायच्या त्याच हातांना एक कलाकार केले आहे.
संगमनेर शहरातील चार महिलांनी एकत्र येत लिबर्टी अर्थवेअर आर्ट या नावाने संस्था स्थापित करत शाडू व लाल मातीच्या पर्यावरण पुरक गणेशमूर्ती तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना काम करणाऱ्याची आवश्यकता होती. महिला कामगार पाहिजे होते आणि त्याचवेळी या आदिवासी समाजातील महिलांनी या संस्थाशी संपर्क साधल्याने या महिलांना आज मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. सर्व आदिवासी महिलांना काही दिवस प्रशिक्षण देऊन ज्या हातात एका काळी खूरप घेऊन शेतात काम करत असे तेच हाता आता अतिशय सुंदर कारागिरी करत शाडू व लाल मातीच्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवत आहे.
संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्ट या संस्थेत आता जवळपास 50 आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एका महिलेला साधारणतः महिण्याला 12 ते 13 हजार रुपये पगार दिला जातो. या सर्व आदिवासी महिला ज्यावेळी दुसऱ्याचा शेतात काम करत होत्या त्यावेळी त्यांना 6 ते 7 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र या सर्व महिला आमच्या संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यापासून त्यांना चांगला पगारा आणि आता एक मूर्तिकार म्हणून या महिलांची ओळख झाली असल्याची माहिती लिबर्टी अर्थवेअर आर्ट संचालिका अल्का हासे यांनी दिली आहे.
हेही वाचा - संजय राऊत म्हणजे 'खोट बोल पण रेटून बोल' - चंद्रकांत पाटील