ETV Bharat / state

Ahmednagar : कृषी व्यवसायाला यांत्रिकीकरणाची जोड दिली, तरच हा व्यवसाय लाभदायी ठरतो - बाळासाहेब थोरात - बाळासाहेब थोरात ट्रॅक्टर वाटप कार्यक्रम

संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळ ( Jayhind Lokchalval ) व महाराष्ट्र शासनाच्या कृषी ( Maharashtra Agriculture Department ) विभागाच्यावतीने पात्र शेतकऱ्यांना सात ट्रॅक्टर व चार गवत काढणे यंत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) उपस्थित होते.

Balasaheb Thorat spoke About agribusiness

author img

By

Published : Feb 21, 2022, 3:09 PM IST

अहमदनगर - संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळ ( Jayhind Lokchalval ) व महाराष्ट्र शासनाच्या कृषी ( Maharashtra Agriculture Department ) विभागाच्यावतीने पात्र शेतकऱ्यांना सात ट्रॅक्टर व चार गवत काढणे यंत्रांचे वितरण करण्यात आले असून कृषी व्यवसायाला यांत्रिकीकरणाची जोड दिली, तर हा व्यवसाय नक्कीच लाभदायी ठरतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी यावेळी बोलताना दिली.

Balasaheb Thorat spoke About agribusiness
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप

काय म्हणाले बाळासाहेब थोरात -

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जयहिंद लोकचळवळीच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील सात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व चार गवत काढणी यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीमध्ये आधुनिकता आणणे गरजेचे आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. याचबरोबर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केला पाहिजे. त्यामुळे कमी कष्टात व कमी वेळेत जास्त उत्पादन घेता येईल. शेती व्यवसायात महिला भगिनींचा ही सातत्याने मोठा वाटा राहिला आहे. त्यांनाही आधुनिक प्रणालींची माहिती झाल्यास नक्कीच या व्यवसायाला व त्या कुटुंबाला फायदा होईल. शेती संशोधनात मोठा वाव असून तरुणांनी आधुनिक शेती बरोबर उद्योग व्यवसायाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

'..तर शेती व्यवसाय नक्कीच फायद्याचा ठरेल' -

जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहित केले जात आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करून नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कृषी विभागाचा ही मोठा सहभाग राहिला आहे. पारंपारिक शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून यांत्रिकीकरणाने शेती केल्यास शेती व्यवसाय नक्कीच फायद्याचे ठरेल असा विश्वास आमदार डॉ. तांबे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - ED Raids in Mumbai : अंमलबजावणी संचनालयाच्या सहा पथकांकडून मुंबईत छापे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.