ETV Bharat / state

Ashadhi Wari 2023 :  वारकऱ्यांच्या  दिंडींचा मुक्काम थेट पोलीस स्टेशनला, 44 वर्षापासून चालू आहे परंपरा!

आषाढी एकादशीला राज्यभरातील वारी पंढरपूरला पोहोचतील. सध्या वारकऱ्यांच्या दिंडीचा पायी प्रवास सुरू आहे. या पायी प्रवासात दिंडीचा रस्त्यात मुक्काम होत असतो. मालेगाव येथील एका दिंडीचा मुक्काम थेट पोलीस स्टेशनमध्ये होत असतो. या दिंडीची पोलीस देखील आतुरतेने वाट पाहत असतात.

मालेगाव येथील सिद्धेश्वर दिंडींचा मुक्काम पोलीस स्टेशनला

author img

By

Published : Jun 19, 2023, 7:10 AM IST

Updated : Jun 19, 2023, 10:46 AM IST

सिद्धेश्वर दिंडींचा मुक्काम अहमदनगरच्या पोलीस स्टेशनला

अहमदनगर : पाऊले चालती पंढरीची वाट असं, म्हणत वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनाला पोहोचतात. पंढरपूरला आपल्या विठू माऊलीला भेटीच्या दरम्यान वाटेत वारकऱ्यांचा अनेक ठिकाणी मुक्काम होत असतो. परंतु एखाद्या दिंडीचा मुक्काम थेट पोलीस स्टेशनमध्ये झाला असं तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही ना, आज आम्ही तुम्हाला अशा एका दिंडीची कथा सांगत आहोत. जी थेट पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करते.

पंढरपूरची दिंडी : आषाढी एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायासाठी खूप महत्त्वाचा दिवस. या एकादशीला वारकरी आपल्या विठू माऊलीचे दर्शन घेणे खूप भाग्याचे समजत असतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वारकऱ्यांच्या दिंडी पायी चालत-चालत पंढरपूरला पोहोचत असतात. साधरण महिनाभर हा प्रवास असतो. राज्यभरातील दिंडी पंढरपूरला पोहोचत असतात. या दिंडींचा प्रवास पायी असल्याने त्या रात्रीच्या वेळी एखाद्या ठिकाणी मुक्काम करत असतात. ज्या ठिकाणी मुक्काम करत असतात. त्या ठिकाणी विठूरायाच्या भक्तीचा गजर होत असतो. परंतु एखादी दिंडी पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करते असे कदाचित तुम्ही ऐकले नसेल. अशी एक दिंडी आहे जी पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करते. ही दिंडी आहे मालेगावमधील आघार खु्द्रुक येथील. ही दिंडी अहमदनगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करत असते.

विठूराया भेटतो : प्रत्येक दिंडी ही पंढरपूरला पोहोचते ते पोलिसांमुळेच. रस्त्यावर ठीक-ठिकाणी ते मदतीला सेवेत हजार असतात. या दिवसांमध्ये जिकडे पहावे तिकडे दिंडी आणि विठ्ठलाचं नामस्मरण होत असल्याचे चित्र आहे. नेहमी नागरिकांच्या सुरक्षेत व्यस्त असलेल्या अहमदनगर एमआयडीसी पोलिसांना दिंडी आल्यामुळे आनंद वाटत असतो. कामामुळे इच्छा असूनही वारीला जाता येत नसल्याने पोलीस कर्मचारी याच दिंडीत आपला विठूराया शोधत असतात. एखाद्या दिंडीचा मुक्काम हा चक्क पोलीस स्टेशनमध्ये होत असल्याचं म्हटल्यानंतर अनेकजण विचारात पडले असतील. दिंडीचा मुक्काम पोलीस स्टेशनमध्ये होतो म्हणजेच स्टेशनच्या आवारात मुक्काम होत असतो. हे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन, असावे जिथे एखाद्या दिंडीचा मुक्काम होतो. वारकरी आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी दरवर्षी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

मालेगाव येथून मुक्कामासाठी आलेल्या दिंडीची सेवा करता येते, हे आमचे भाग्य समजतो. तसेच पोलीस स्टेशनमध्ये देखील चैतन्याचे वातावरण निर्माण होत असते. कर्मचारी आणि अधिकारी कामाच्या ताण-तणावातून काही काळ का होईना तणाव मुक्त होतात.- एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप

44 वर्षाची परंपरा : मालेगाव येथील सिद्धेश्वर दिंडीचा अहमदनगर एमआयडीसी पोलीस स्टेशनला मुक्काम करण्याचा इतिहास हा खूप जुना आहे. अहमदनगर एमआयडीसी पोलीस स्टेशन गेली 44 वर्षापासून मालेगाव येथील सिद्धेश्वर दिंडींचा मुक्काम आपल्याकडे ठेवत असते. एवढंच नाही तर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी वारकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला येतात. यावेळी टाळ वाजवत- भक्ती नादात नाचत महिला पोलीस कर्मचारीदेखील दिंडीत सहभागी होण्याचा आनंद लुटतात. अहमदनगरमधील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या स्थापनेपासून मालेगाव येथील ही दिंडी मुक्कामाला पोलीस स्टेशनला येत असते. सन, उत्सव काळात पोलीस कर्मचाऱ्यांना इच्छा असून देखील पंढरपूरला जाता येत नाही. परंतु अशा दिंडीचे स्वागत करून त्यातच विठ्ठल भेटतो, असे मानून सर्व कर्मचारी कुटुंबासह या दिंडीची सेवा करतात. एवढंच नाही तर त्यादिवशी जेवणाचा संपूर्ण खर्च हा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपल्या एक दिवसाच्या पगारातून करतात. पोलीस स्टेशनमध्ये दिंडी मुक्कामाला आल्यानंतर येथील पोलीस निरीक्षकांनी विठूरायाकडे बळीराजासाठी प्रार्थना केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती व्यवस्थित राहो, लवकरात लवकर पाऊस पडून बळीराजा सुख यावे, अशी मागणी विठ्ठलाच्या चरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी यावेळी केली .

अहमदनगर मधील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या दिंडीचा मुक्काम होतो. त्यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना जेवढा आनंद या ठिकाणी मुक्कामाला आल्यावर होतो, तेवढाच आनंद एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होतो असे दिंडी प्रमुख नाना महाराज पगार सांगतात. - नाना महाराज पागर.

हेही वाचा -

  1. Ashadhi wari 2023 : तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल, अजित पवारांनी केले सारथ्य
  2. Ashadhi Vari : आज पुण्यातून पालखींचे होणार प्रस्थान; वाहतुकीमध्ये बदल पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे पोलिसांकडून आवाहन
  3. Ashadhi Wari 2023 : 'पाऊले चालती पंढरीची वाट', फोटोतून पहा आषाढी वारी

Last Updated : Jun 19, 2023, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.