ETV Bharat / state

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी.. दुष्काळी पाथर्डी तालुक्यात झाला दमदार पाऊस

बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर विमानांच्या सहाय्याने कृत्रिम पावसासाठी रसायनांची फवारणी करण्यात आली. सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली.

पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:58 PM IST

अहमदनगर- समाधानकारक पाऊस न पडल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून पाथर्डी तालुक्यात गुरुवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत असून पाथर्डी तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

ढगांवर रसायनाची फवारणी करताना विमान

जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका, इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळी परिस्थिती कायम आहे. त्यामुळे पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनातर्फे प्रथमच औरंगाबाद येथील विमानतळावरून विमानाच्या साहाय्याने तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला.

बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर विमानांच्या सहाय्याने कृत्रिम पावसासाठी रसायनांची फवारणी करण्यात आली. सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. मात्र कृत्रिम पावसामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानूर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूर पर्यंत या प्रयोगामुळे दमदार पावसाची सुरुवात झाली होती.

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी, तालुक्यातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Intro:अहमदनगर- पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात कृत्रिम पाऊस यशस्वी..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_artificial_rain_vij_7204297

अहमदनगर- पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात कृत्रिम पाऊस यशस्वी..

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी बुधवारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केल्याने तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यंदा जून नंतर समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी,बाजरी,मका, इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असली तरी तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळ कायम असून अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे,पाऊसा अभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. परंतु यामुळे करोडी,तिनखडी,मोहटा,कोरडगाव, भिलवडी,मोहजदेवढे,पिंपळगाव,टाकळीमानुर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूर पर्यंत या प्रयोगामुळे दमदार पावसाची सुरुवात झाली होती. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात कृत्रिम पाऊस यशस्वी..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.