ETV Bharat / state

अमृतवाहिनी सहकारी बँकेमुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम - महसूलमंत्री - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सहकारी बँकामुळे मोठी मदत झाली आहे. सहकारी बँकांमध्ये आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असून ती अमृतवाहिनी बँकेने कायम जपली आहे, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

Revenue Minister balasaheb thorat
Revenue Minister balasaheb thorat
author img

By

Published : Mar 20, 2021, 6:31 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सहकारी बँकामुळे मोठी मदत झाली आहे. सहकारी बँकांमध्ये आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असून ती अमृतवाहिनी बँकेने कायम जपली आहे. या बँकेवर सभासद व नागरिकांचा मोठा विश्वास असून अमृतवाहिनी सहकारी बँकेमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम झाली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

यावेळी थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मदती करता अमृतवाहिनी बँकेची स्थापना केली. या बँकेने सातत्याने शेतकर्‍यांना मोठी आर्थिक मदत केली आहे. तालुक्याच्या आर्थिक विकासात या बँकेचे मोठे योगदान राहिले आहे. बँकेची वाटचाल गौरवास्पद असून यापुढेही बँकेने आर्थिक शिस्त जपत आपला लौकिक कायम ठेवला पाहिजे. खरंतर जिल्हा सहकारी बँक व विविध सहकारी बँकांनी शेतकर्‍यांना मोठी मदत केली आहे.

या बँकांची कर्जांची वसुली देणे हे प्रत्येक सभासदाचे काम आहे. त्यामुळे आपल्याला मदत करणार्‍या या बँका टिकणार आहेत. आरबीआयचे दिवसेंदिवस निर्बंध अनेक कडक होत असून सर्व संचालक मंडळ व अधिकारी यांच्यासह प्रत्येक सभासदाने ही निर्बंध जपणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात सहकारी पतसंस्थांची मोठे जाळे आहे. दूध संस्था व पतसंस्था हा प्रयोग तालुक्यात यशस्वी झाला असून या संस्थांमधून सुमारे चौदाशे कोटींच्या ठेवी तालुक्यात आहेत. अमृतवाहिनी बँकेने कायम ऑडिटचा अ वर्ग ठेवला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक शेतकर्‍यांकडे विविध बँकांची थकबाकी आहे. मात्र आता आपण प्रत्येकाने थोडे थोडे सावरत ही बाकी नियमित केली पाहिजे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे थोरात म्हणाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.