- अहमदनगर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी येथील साईमंदिरात पोहोचले आहेत.
- अमित शाहांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
Amit Shah Maharashtra Visit : सहकार परिषद कार्यक्रमात अमित शाह म्हणाले...'प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र'; वाचा प्रत्येक अपडेट्स - शाह घेणार शिर्डीत साईबाबांचं दर्शन
16:24 December 18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी येथील साईमंदिरात पोहोचले
14:21 December 18
प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र
प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र आहे.
या भूमीत सहकाराची पायाभरणी करण्याचं काम झालं.
देशात सहकाराच्या क्षेत्राला काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रवरानगरला येऊन कपाळाला इथली माती लावावी, असं अमित शाह म्हणाले
14:18 December 18
जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? अमित शाह यांचा सवाल
नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल अमित शाह यांनी केला. सहकारी बँकांच्या पाठिशी नरेंद्र मोदी आहेत, असे अमित शाह म्हणाले.
14:17 December 18
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका
देशातील पहिल्या सहकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले. एमएसपी लावल्याने साखर कारखाने तरले आहेत. अमित शाह हे सहकारी चळवळीतून तायर झालेले नेते आहेत. त्यांनीच इथेनॉलसंदर्भात निर्णय घेतला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणत आहेत तेच सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत. अशी अप्रत्यक्ष टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.
12:52 December 18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट सहकार परीषदेला पोहचले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्यात पोहचले आहेत. ते थेट विमानतळावरून कार्यक्रमात पोहचले. अमित शाह आज शिर्डी येथे साई दर्शनाने आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार होते. मात्र, त्यांच्या आगमनाच्या वेळीच साई मंदिरात आरती सुरू असल्यामुळे दर्शनाची रांग बंद ठेवण्यात येते. त्यामुळे अमित शाह थेट सहकार परिषदेच्या ठिकाणी पोहचले. तेथून निघताना ते साई दर्शनासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
12:22 December 18
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विमानतळावर आगमन झाले आहे. विमानतळावरून ते थेट क्रार्यक्रमाकडे रवाना झाले आहेत.
11:58 December 18
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्ताने भाजपचे अनेक नेते शिर्डीत दाखल झाले आहेत.
11:56 December 18
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होणार होता. सकाळी 11.15 वाजचा दर्शनासाठी मंदिरात दाखल होणार होते. मात्र, यांच्या दौऱ्याला 1 तास उशिर झाला आहे.
11:54 December 18
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
11:46 December 18
Amit Shah Maharashtra Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीप प्रज्वलन; वाचा प्रत्येक अपडेट्स
अहमदनगर - केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. पुर्वनियोजित दौऱ्यानुसार, शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होणार होता. मात्र, बारा वाजता साईबाबांची आरती सुरू होत असल्याने दर्शनरांग बंद असते. त्यामुळे अमित शाह थेट सहकार परीषदेला पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहकार परीषदेनंतर साईदर्शन घेण्याची शक्यता आहे.
अमित शाह प्रवरानगर ( Amit Shah visit Pravaranagar Loni in Ahmednagar ) इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. अहमदनगरमधील प्रवरा इथे देशाची पहिली सहकार परिषद होत आहे. भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe) यांनी या सहकार परिषदेचं आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहे. यानंतर सांयकाळी शाह मुंबईत ICSI राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाला हजेरी लावतील.
दौऱ्याचा दुसरा दिवस -
तर दुसऱ्या दिवशी ते पुणे शहराला भेट देतील. गृहमंत्री शाह थेट पुणे महापालिकेत येणार ( Amit Shah to visit Pune ) असून त्यांच्या शुभहस्ते महापालिकेतील हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ( Dedication of statue Dr Babasaheb Ambedkar in pune ) होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहेत असे मोहोळ म्हणाले. दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित राहणार आहे.