शिर्डी (अहमदनगर) All Religions March In Shridi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. (rally of all religions in Shirdi) शिर्डीतही गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजातील सात जण आमरण उपोषणाला बसलेले असून जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय.
आरक्षणासाठी सर्वधर्मियांची पायी रॅली : 'एकच मिशन मराठा आरक्षण' मराठ्यांचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राहता तालुक्यातील 7 मराठा बांधव शिर्डी नगरपरिषदे शेजारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान शिर्डीत सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज शिर्डीतील सर्वधर्मीय लोकांनी पाठिंबा दिला दिला. शिर्डीतील साई निर्माण स्कूलचे विद्यार्थी आणि शिर्डी ग्रामस्थांनी उपोषण स्थळापासून शिर्डीतील साई पालखी मार्गे पायी रॅली काढत हातात आरक्षणाच्या मागणीचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकारचा निषेध व्यक्त केला. दरम्यान हा मोर्चा पुन्हा उपोषण स्थळी पोहचल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. या मोर्चात सर्वजातीय लोकांनी सहभाग घेतला होता.
तर दिवाळी साजरी करणार नाही : मराठा समाज आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की, राज्यातील मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं नाही तर आम्ही दिवाळी सण साजरा करणार नाही. काळी दिवाळी घोषित करून सरकारचा वेगळ्या पद्धतीने निषेध करू असा इशारा राहता तालुक्यातील अस्तगाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आलाय.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला नागरिकांचा प्रतिसाद : राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत जागरूक असलेल्या राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे सकल मराठा समाज बांधवांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगे पाटलांच्या मागणीच्या समर्थनार्थ अस्तगाव बाजारतळ येथे साखळी उपोषण सुरू केलं गेलंय. अस्तगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या अस्तगावातील तरकसवाडी, मोरवाडी, चोळकेवाडी येथील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत या मागणीकरिता साखळी उपोषण सुरू केलयं.
हेही वाचा:
- Maratha Reservation Live Updates: मनोज जरांगे पाटील यांचे नवव्या दिवशी उपोषण सुरूच, राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार भेट
- All Parties MLAs agitation in Mumbai : सर्वपक्षीय आमदारांचे सलग तिसऱ्या दिवशी मंत्रालयामोर आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
- Maratha Reservation Live Updates: मनोज जरांगे पाटील यांचे नवव्या दिवशी उपोषण सुरूच, राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार भेट