अहमदनगर - आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला काल पासून 'नॉटरिचेबल' असणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी रात्री उशिरा कर्जत तालुक्यातील खासगी मालकीच्या अंबालिका कारखान्यावर आले होते.
पवार यांच्यासोबत त्यांचे साखर कारखाना व्यवसायातील भागीदार वीरधवल जगदाळे असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ते या ठिकाणी दाखल होण्यासंदर्भात माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. याबाबत कारखाना प्रशासन किंवा कारख्यान्याशी संबंधित असणारे कोणतीही माहिती नसल्याचे सांगत होते.
हेही वाचा या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !
तसेच कारखान्यावर नेहमीच्या गेस्ट हाऊसवर न थांबता ते पूर्वी वरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या एका बंगल्यात थांबल्याची माहिती मिळत आहे. तसेच सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनी आज शनिवारी पहाटेच हा मुक्काम हलवला असून ते अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत.